You are currently viewing भाजपच्या फसव्या आश्वासनाला कंटाळून श्रावण येथील कार्यकर्ते स्वगृही परत.

भाजपच्या फसव्या आश्वासनाला कंटाळून श्रावण येथील कार्यकर्ते स्वगृही परत.

*भाजपच्या फसव्या आश्वासनाला कंटाळून श्रावण येथील कार्यकर्ते स्वगृही परत.*

*मालवण*

दोन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपमांचायत निवडणुकीत श्रावण येथील प्रमोद गवळी, सुरेश पंधारे, चंद्रशेखर लाड या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना भाजपच्या नेत्यांनी व पदाधीकाऱ्यानी श्रावण येथे सभामंडप उभारण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनांना दोन वर्षे पूर्ण झाली तरी देखील भाजपकडून सभामंडप पूर्ण झाला नाही. भाजपला आश्वासनांचा विसर पडला. या कार्यकत्यांनी भाजप नेत्यांकडे अनेकवेळा पाठपुरावा देखील केला मात्र त्यांना टाळण्यात आले.
निवडणूक आली कि फसवी आश्वासने देऊन इतर पक्ष्याच्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांची फसवणूक करण्याचे काम भाजप मधून होत आहे. अनेक गावात अशीच आश्वासने निवडणुकीमध्ये देण्यात आली आहेत. मात्र या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. भाजपची हि फसवेगिरी श्रावण येथील कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्याने आमदार वैभव नाईक यांची भेट घेऊन त्यांच्या समोर कैफियत मांडून दिलगिरी व्यक्त केली व आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी दुलाजी परब, स्वप्नील दळवी, अभिजित पवार, ओंकार लाड आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा