You are currently viewing सिंधुदुर्गातील मुंबईस्थित शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व चाकरमान्यांची मुंबईत ८ ऑगस्ट रोजी बैठक

सिंधुदुर्गातील मुंबईस्थित शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व चाकरमान्यांची मुंबईत ८ ऑगस्ट रोजी बैठक

उपस्थित राहण्याचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख आ.वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते यांचे आवाहन

शिवसेना संघटनात्मक बांधणीसाठी मुंबईत वास्तव्यास असलेल्या सिंधुदुर्ग वासियांची बैठक सोमवार दिनांक ८ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ६.०० वाजता शिशु विकास हाॅल, शिरोडकर हायस्कूल परेल, मुंबई येथे आयोजित केली आहे.
सदर बैठकीत शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख प्रमुख आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, बदलापूर, अंबरनाथ, मीरा रोड, नालासोपारा आदी ठिकाणी वास्तव्यास असलेले शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व चाकरमानी जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुळ रहिवासी आहेत त्यांनी बैठकीला मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आ.वैभव नाईक,व संजय पडते यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा