You are currently viewing नाटळ जि. प.मतदार संघाचे कोविड केअर सेंटर राज्याला आदर्शवत – आम.नितेश राणे

नाटळ जि. प.मतदार संघाचे कोविड केअर सेंटर राज्याला आदर्शवत – आम.नितेश राणे

मोफत कोविड सेंटर व ग्राम विलगीकरण कक्ष उद्धाटन समारंभ

कोरोना रुग्ण कोविड सेंटरमध्ये उपचार घेऊन बरे व्हावेत आणि कोरोना हद्दपार व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.कोरोना रुग्णांसाठी सर्व सुख सोई उपलब्ध करून देणारे नाटळ जिल्हा परीषद मतदार संघाचे कोविड केअर सेंटर राज्याला आदर्शवत आहे असे उदगार आम. नितेश राणे यांनी काढले.

जि प अध्यक्ष सौ संजना संदेश सावंत आणि माजी जि प अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांच्या संकल्पनेतून नाटळ मतदार संघात सर्व सोयींनी युक्त असे कोवीड सेंटर जि प शाळा नाटळ खांदारवाडी सुरू करण्यात आले असून या कोवीड सेंटरचे लोकार्पण आम,।नीतेश राणे यांच्या हस्ते झाले.. या कोवीड सेंटरमध्ये सांगवे, कुंभवडे, नाटळ, दिगवळे, नरडवे, दारिस्ते व शिवडाव गावातील कोवीड रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत.
प्रस्तावित ३५ बेडचे कोवीड सेंटर सर्व सोयींनी सुसज्ज करण्यात आले असून या कोवीड सेंटरमध्ये २४ तास डॉक्टर व नर्स सेवा उपलब्ध,प्रत्येक रुम मध्ये टीव्ही ,इनडोअर खेळाचे साहित्य या सारख्या अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या उद्घाटनप्रसंगी जि. प. अध्यक्ष सौ. संजना सावंत, माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, मुख्यकार्य अधिकारी प्रजित नायर, कणकवली तहसिलदार रमेश पवार, कणकवली सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. संजय पोळ,नाटळ मतदार संघातील सर्व सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.

सुसज्य कोविड केअर निर्माण केल्याबद्दल मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी कौतुक करताना सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे दिले आश्वासन दिले.कोविड पाॅझिटीव्ह गोर गरिब रुग्णांना अद्ययावत सेवा देवून नाटळ मतदार संघ करणार कोविड मूक्त करणार असल्याचे माजी जि. प.अध्यक्ष संदेश सावंत म्हणाले.सुत्रसंचालन व आभार सुशांत मर्गज यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − 6 =