You are currently viewing कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची मुख्यकार्यकारीअधिकारी यांच्याशी सहविचार सभा संपन्न….

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची मुख्यकार्यकारीअधिकारी यांच्याशी सहविचार सभा संपन्न….

कणकवली

कास्ट्राईब कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग ची सहविचार सभा मुख्यकार्यकारीअधिकारी यांच्या दालणात संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम यांच्या नेतृत्वा खाली तसेच कास्ट्राईब संघटनेचे राज्य सचिव सुरेश तांबे, आकाश तांबे आणि सर्व खाते प्रमुखांच्या उपस्थितीत मुख्यकार्यकारीअधिकारी यांच्या घेण्यात आली. संदीप कदम यांनी मुख्य कार्यकारीकारीअधिकारी व सर्व खाते प्रमुखांचे स्वागत व प्रास्ताविक केले. सहविचार सभेत अनुषेश आणि रिक्त पदोन्नती बाबतचा आढावा सर्व खाते प्रमुखांनी दिला सदरवेळी संघटनेच्या वतीने तात्काळ अनुषेश पूर्णपणे भरावा तसेच पदोन्नती भरती प्रक्रियेत सेवाज्येष्ठतेचा विचार करून कोणाही प्रवर्गातील कर्मचार्‍यावर अन्याय होणार नाही अशी संघटनेने मागणी केली. त्या बाबत कार्यवाही करण्याच्या मुख्यकार्यकारी यांनी सुचना दिल्या. जिल्हा परिषद अंतर्गत अनुकंपा भरती बाबत कास्ट्राईब संघटनेकडुन वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता या बाबत विचारले असता मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी तेवीस उमेद्वारांना नियुक्ती दिली आहे असे सांगुन भरती केलेल्या उमेदवारांची यादीची प्रत कास्ट्राईब संघटनेस दिली . अनुंकपा धारकांना न्यायदिल्या बद्दल कास्ट्राईब संघटनेच्या वतीने मुख्यकार्यकारीअधिकारी व प्रशासनाचे खास अभिनंदन करण्यात आले. प्राथमिक शिक्षण विभागात काही प्रभारी गटशिक्षणाधिकारी मनमानीपणे प्रशासन चालवत आहेत शिक्षक कामगिरीवर काढताना अनेकांची गैरसोय आणि आपणाला हव्या त्या शिक्षकांना सवलती दिल्या जात आहेत . नियमबाह्यपणे ऊठसुठ कामगिरी काढणाऱ्या अधिकाऱ्यांबाबतीत संघटनेने तक्रार केली असता देवगड प्रभारी गटशिक्षणाधिरी थोरात यांना दोन दिवसात बोलवुन घ्या व चौकशी करा असे आदेश मिटिंग मध्ये मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी शिक्षणाधिकारी आंबोवकर यांना दिले. तसेच प्राथमिक गटशिक्षणाधिकारी पदे कायम स्वरूपी भरण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न प्रशासनाने करावेत असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले . सातव्या वेतन आयोगातील तरतुदी नुसार ज्या कर्मचाऱ्यांची सलग सेवा झाली आहे त्यांना कालबदद् पदोन्नती आणि आश्वासित प्रगती योजने अंतर्गतचा लाभ अनुज्ञेय आहे त्यांना लाभ देण्याची कार्यवाही प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात आले. नवीन शासन परिपत्रकानुसार निलंबित कर्मचाऱ्यांची चौकशी तीन महिण्यात पूर्ण करून त्यांचे वेतन व भत्ते घ्यावेत अशी संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आले . अशी मागणी करण्यात आली या बाबत मुख्यकार्यकारीअधिकारी यांनी सर्व खाते प्रमुखांना अवगत केले. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचे DCPS चे दोन हप्ते जमा झालेले नाहीत या बाबत संघटनेच्या वतीने विचारणा केली असता शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना मुख्यकार्यकारीअधिकारी यांनी विचारणा करून तात्काळ कारवाई करण्या बाबत सुचना देण्यात आल्या. सहविचार सभेत कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम, राज्य सचिव सुरेश तांबे, शिक्षक संघटना राज्य सरचिटणीस आकाश तांबे, कोकण विभागागिय अध्यक्ष मधुकर राठोड, महासंघ उपाध्यक्ष रमाकांत जाधव, कास्ट्राईब जिल्हापरिषदचे अध्यक्ष राजेंद्र कदम, ग्रामसेवक संघटना जिल्हाध्यक्ष मंगेश साळसकर, ग्रामसेवक संघटना महासचिव प्रशांत जाधव, प्राथमिक संघटना जिल्हाध्यक्ष किशोर कदम,महासचिव विकास वाडीकर, माध्यमिक संघटना जिल्हाध्यक्ष रवि तांबे, महासचिव शेषकुमार नाईक, मुख्याध्यापक किशोर यादव, संजय पेंडुरकर व अन्य पदाधिकारी यांनी चर्चेत सहभाग घेतला .

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 3 =