You are currently viewing वेंगुर्ल्याची दिव्यता सिताराम मसुरकर प्रथम; तर मालवण मधील निरिजा संतोष नागवेकर द्वितीय क्रमांकावर..

वेंगुर्ल्याची दिव्यता सिताराम मसुरकर प्रथम; तर मालवण मधील निरिजा संतोष नागवेकर द्वितीय क्रमांकावर..

सिंधुदुर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हास्तरीय ऑनलाईन संभाषण स्पर्धेत दिव्यता सिताराम मसुरकर (वेंगुर्ले) प्रथम तर नीरजा संतोष नागवेकर (मालवण) हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या विजेत्या स्पर्धकांची पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे. अशी माहिती नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक मोहित कुमार  सैनी यांनी दिली.

युवा कार्य व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र मार्फत राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांनी सार्वजनिक विषयांमध्ये संधी प्राप्त व्हावी, या उद्देशाने 18 पेक्षा जास्त व  25 पेक्षा कमी वयोगटातील युवकांसाठी जिल्हा वर राज्य राष्ट्रीय स्तरावरील युवा संवाद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली असून राष्ट्रीय स्तरीय स्पर्धा प्रत्यक्ष भाषण पद्धतीने दिल्ली संवाद भवन मध्ये होणार आहे. तर पंतप्रधान यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे आयोजन करून राष्ट्रीय स्पर्धेकरिता प्रथम द्वितीय तृतीय विजेत्यांना अनुक्रमे दोन लाख दीड लाख एक लाख अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. सदर स्पर्धा हे हिंदी व इंग्रजी भाषेतून घेण्यात येणार आहे. तसेच जिल्हा राज्य स्तरीय स्पर्धेसाठी मात्र मराठी हा विषय आहे. सदर भाषण सभेकरिता स्पर्धकाला फक्त चार मिनिटे वेळ देण्यात आली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हास्तरीय ऑनलाईन संभाषण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या दिव्यता सिताराम मसुरकर आणि द्वितीय क्रमांक प्राप्त नीरजा संतोष नागवेकर यांचे निवड झाल्याचे नेहरू युवा केंद्राच्या एका प्रसिद्धी पत्रकातून कळविण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + six =