You are currently viewing अर्जुन रावराणे विद्यालयात मेमरीकार्डद्वारे मिळणार अभ्यासाचे धडे 

अर्जुन रावराणे विद्यालयात मेमरीकार्डद्वारे मिळणार अभ्यासाचे धडे 

हिंदुश फांऊंडेशन मुंबई व संस्थेचा पुढाकार

वैभववाडी
दहावी अभ्यासक्रमाचा समावेश असलेले मेमरीकार्ड येथील अर्जुन रावराणे विद्यालयात मोफत देण्यात आले. हिंदुश फांऊंडेशन अंधेरी या संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यालयातील विद्यार्थ्यांना याचे वाटप करण्यात आले. या नव्या प्रणालीमुळे नेटवर्कच्या समस्येची कटकट दुर होणार आहे. कोरोना काळात शाळा बंद आहेत. आँनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. मात्र ग्रामीण भागात नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांना मोठा फटका बसत आहे.

मुंबईतील हिंदुश फांऊंडेशन या संस्थेने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नवी प्रणाली विकसित केली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना मेमरीकार्डद्वारे अभ्यासाचे धडे शिकता येणार आहेत. तालुक्यातील अर्जुन रावराणे विद्यालयात ही नवी प्रणाली यावर्षी सुरू करण्यात येत आहे. यावेळी संस्थेचे अधिक्षक जयेंद्र रावराणे, हिंदुश फांऊंडेशनचे मधुकर शिंदे, सौ.शिंदे, माजी नगरसेवक संजय सावंत, प्रा.नामदेव गवळी, निवृत्त मुख्याध्यापक एस. एस. परब, भाऊ शिंदे, श्री. कोलते, मुख्याध्यापक भास्कर नादकर, विजय रावराणे आदी उपस्थित होते.

जयेंद्र रावराणे म्हणाले, शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही अनेक महत्त्वपुर्ण निर्णय घेतले आहे. कोरोना काळातही विद्यार्थ्यांना आम्ही शिक्षणाचे धडे देत होतो. प्रशालेत सर्व उपक्रमशील शिक्षक आहेत. दर्जेदार विद्यार्थी घडविण्याच काम ते करीत आहे. मेमरीकार्डद्वारे शिक्षण ही संकल्पना मिळाल्याने आमच्या विद्यार्थ्यांना याचा अधिक लाभ होईल असा विश्वास रावराणे यांनी व्यक्त केला. मधुकर शिंदे म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोरोना काळात शिक्षणाच्या सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी हिंदुश फांऊंडेशन मार्फत ही संकल्पना राबवित आहोत. संस्थेच्या या नवीन उपक्रमाला संजय सावंत, एस. एस. परब, प्रा.नामदेव गवळी, विजय रावराणे यांनी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 3 =