You are currently viewing स्वतःमधील नैपुण्य दाखवण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना संधी – महेश गुरव

स्वतःमधील नैपुण्य दाखवण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना संधी – महेश गुरव

स्वतःमधील नैपुण्य दाखवण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना संधी – महेश गुरव

कणकवली केंद्रबलातील बाल कला, कीड़ा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचा शुभारंभ..

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामान्य शेतकऱ्यांची मुले या महोत्सवाच्या माध्यमातून कला क्रीडा क्षेत्रात नावारुपास यावेत, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून या स्पर्धेचे जिल्हा परिषदच्या माध्यमातून आयोजन केले जाते. खरंतर विद्यार्थ्यांच्या दृष्टीने स्वतःमधील नैपुण्य दाखवण्याच्या दृष्टीने मोठी संधी आहे, त्या संधीचे सोने करत विद्यार्थ्यांनी खेळाचा आनंद घेतला पाहिजे. स्पर्धा म्हटल्यावर हार जीत असते कुणीतरी जिंकणार आणि कोणीतरी हरणार असतो.स्पर्धेत खेळताना खिलाडी वृत्तीने यश अपयश स्वीकारले पाहिजे. यश मिळवले म्हणजे त्या यशाचे सातत्य टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. तर अपयश आलेल्या विद्यार्थ्यांनी पुढील काळात त्याचे यशात रूपांतर करण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. यासाठीच जिल्हा परिषद च्या माध्यमातून महोत्सव आयोजित केले जात असल्याचे प्रतिपादन आशिये सरपंच महेश गुरव यांनी केले.

जि.प. सिंधुदुर्ग आयोजित, कणकवली केंद्रबलातील बाल कला, कीड़ा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचा शुभारंभ कणकवली कॉलेज कणकवलीच्या क्रीडांगणावर मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.यावेळी आशिये सरपंच महेश गुरव , कलमठ सरपंच संदीप मेस्त्री , केंद्रप्रमुख के. एम्. पवार , केंद्रमुख्याध्यापिका कणकवली शाळा न.१ सायली गुरव , केंद्रमुख्याध्यापिका कणकवली शाळा नं.३ करंबेळकर मॅडम , केंद्रमुख्याध्यापिका कणकवली नं.४ प्राजक्ता सावंत , केंद्रमुख्याध्यापिका कणकवली नं.५ कल्पना मलये , केंद्रमुख्याध्यापिका कणकवली नं.६ वि‌द्या पेडणेकर , कलमठ बाजारपेठ मधुरा सावंत ,शिक्षक प्रदीप मांजरेकर, कलमठ- कुंभारवाडी बुचडे , कलमठ-गावडेवाडी श्रीमती आंगणे आदी मान्यवर उपस्थित होते.

महेश गुरव म्हणाले,केंद्र स्तरावरील स्पर्धेसाठी विजय संपादन करण्यासाठी आपण सर्वच खेळाडूनी या स्पर्धेत सहभाग घेतला. जिल्हा परिषद च्या माध्यमातून आयोजित या स्पर्धांना महोत्सवी स्वरुप प्राप्त होते.प्रत्येक शाळा आणि शाळेमधील विद्यार्थी स्पर्धेत मोठ्या उमेदीने सहभाग घेतात, या स्पर्धेचे हे वैशिष्ट्य आहे. जिल्हा परिषद च्या माध्यमातून भरीव आर्थिक तरतूद या स्पर्धांसाठी केली जाते.

केंद्रप्रमुख के. एम्. पवार म्हणाले, जिल्हा परिषद च्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना व्यासपीठ देण्याच्या हेतूने या स्पर्धा आयोजित केल्या जातात. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये घेतलेला सहभाग उज्वल भविष्याकडे नेणारा आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्त गुरव,तर आभार संतोष घाडीगावकर,सहायक प्रमोद पवार यांनी सहकार्य केले.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क :*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा