You are currently viewing सावंतवाडीत रक्तदात्यांचा गौरव

सावंतवाडीत रक्तदात्यांचा गौरव

सावंतवाडी :

सावंतवाडी येथील आरपीडी हायस्कूलच्या सभागृहात जागतिक रक्तदान दिन आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील निवडक रक्तदात्यांच्या व रक्तदान क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांच्या सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये सामाजिक कार्यकर्ते संजू विर्नोडकर आणि टीमचा सन्मान करण्यात आला.

कोव्हीड काळात केलेल्या कार्याबद्दल तसेच रक्तदानासाठी आजवर दिलेल्या योगदानाबद्दल हा सन्मान करण्यात आला. सावंतवाडीसह गोवा-बांबुळी इथं रुग्णांना रक्तदान करण्यासाठी ते घेत असलेल्या मेहनतीसाठी हा सन्मान करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदचे माजी आरोग्य सभापती विकास सावंत, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, प्रतिष्ठानचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सुनील राऊळ, सचिव बाबली गवंडे, विजयकुमार जोशी, महेश राऊळ, अमेय मडक, सुधीर पराडकर, किशोर नाचणोलकर, आनंद वेंगुलेकर, मकरंद सावंत, निलेश मोरजकर, संजय पिळणकर, सागर नाणोस्कर, एकनाथ चव्हाण आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 11 =