You are currently viewing सावंतवाडी येथे केंद्रिय मंत्री नारायणराव राणेंचा सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वागत…

सावंतवाडी येथे केंद्रिय मंत्री नारायणराव राणेंचा सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वागत…

*सावंतवाडी येथे केंद्रिय मंत्री नारायणराव राणेंचा सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वागत…

सावंतवाडी

लोकसभेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे भाजप-राष्ट्रवादी-शिवसेना महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा.ना. दिपकभाई केसरकर व सावंतवाडी नगरपरिषदेचे मा.उपनगराध्यक्ष राजू बेग यांचा नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडी बाहेरचावाडा येथे मुस्लीम बांधवांची सभा संपन्न झाली.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष अर्षद बेग व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रफुल्ल सुद्रीक यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी कणकवली-देवगड विधानसभा अध्यक्ष डॉ.अभिनंदन मालंडकर,मा.सभापती मकरंद परब, राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग जिल्हाध्यक्ष हार्दिक शिगले व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा