राष्ट्रवादी सावंतवाडीच्यावतीने उपमुख्यमंत्री नाम.अजित पवार यांचा वाढदिवस साजरा

राष्ट्रवादी सावंतवाडीच्यावतीने उपमुख्यमंत्री नाम.अजित पवार यांचा वाढदिवस साजरा

सिंधुदुर्ग जिल्हा विकासासाठी निधी दिल्याबद्दल मानले आभार

सावंतवाडी

राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडीच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कोव्हीड नियमांच पालन करत हा वाढदिवस साजरा करण्यात आला. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या हस्ते केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन, आरोग्य, कोरोना परिस्थितीत कोट्यवधीचा निधी उपलब्ध करून दिला‌. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोकण विभागातील सात जिल्ह्यांच्या जिल्हा वार्षिक योजनांच्या प्रारुप आराखड्यांना मंजुरी देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचा या धडाकेबाज कार्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचावतीनं शुभेच्छा देण्यात आल्या. तर अजित पवार यांच्या वाढदिनानिमित्त जिल्ह्यात रक्तदान शिबिर, गरजूंना धान्य वाटप, आरोग्याचा दृष्टीकोनातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, संदीप राणे, उद्योग व व्यापार महिला जिल्हाध्यक्ष दर्शना बाबर-देसाई, युवती महिला तालुकाध्यक्ष जहिरा ख्वाजा, सावली पाटकर, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष जावेद शेख, सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष प्रा. सचिन पाटकर, उद्योग व व्यापार तालुकाध्यक्ष नवल साटेलकर, पदवीधर मतदारसंघ तालुकाध्यक्ष प्रसाद दळवी, राष्ट्रवादी पदाधिकारी आसिफ ख्वाजा, उद्योग व व्यापार जिल्हा सरचिटणीस नियाज शेख, तालुका उपाध्यक्ष याकुब शेख, कौस्तुभ नाईक आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा