You are currently viewing आरोलकर दशावतार नाट्य मंडळ आरवली नाट्यस्पर्धेत प्रथम

आरोलकर दशावतार नाट्य मंडळ आरवली नाट्यस्पर्धेत प्रथम

वेंगुर्ला :

 

नटसम्राट मच्छीन्द्र कांबळी व दशावतारातील नटसम्राट लोकराजा सुधीर कलिंगण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आरवली येथे दशावतारी नाट्यस्पर्धा झाली. या स्पर्धेतील विजेत्या मंडळाना केंद्रिय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते गौरवण्यात आले.या स्पर्धेत प्रथम-आरोलकर दशावतार नाट्य मंडळ आरवली यांचा ‘श्रीयळ चांगुणा ‘, द्वितीय-चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ यांचा’वज्रशल्क ‘, तृतीय-सुधीर ताडेल ग्रुप वराड यांचा ‘महारथी कर्ण’ यांनी क्रमांक पटकविले.

या नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट राजपार्ट-विघ्नराजेंद्र कोंडुकर(कृष्ण),सर्वोत्कृष्ट स्त्रीपार्ट-सुधीर तांडेल(कुंती), सर्वोत्कृष्ट खलनायक-प्रथमेश खवनेकर(वज्रासूर), विशेष उल्लेखनीय भूमिका-सुहास माळकर(यती) ,सर्वोत्कृष्ट हर्मोनियम वादक- मंदार जोशी,बालकलाकार-कु सुरज परब(चिलिया) यांना गौरवण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा