You are currently viewing मुंबई उपमहापौर संजय घाडी यांचा पडेल येथे जाहीर सत्कार
Oplus_16908288

मुंबई उपमहापौर संजय घाडी यांचा पडेल येथे जाहीर सत्कार

गावाच्या सुपुत्राचा ग्रामस्थांकडून गौरव; सरपंच भुषण पोकळे यांच्या हस्ते सत्कार संपन्न

देवगड / पडेल :

आज शनिवार दि. २३ मे २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता पडेल गावचे सुपुत्र तथा मुंबई महानगरपालिका उपमहापौर मा. श्री. संजय घाडी यांचा ग्रामपंचायत पडेल व गावाच्या वतीने जाहीर सत्कार कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात ग्रामपंचायत पडेल येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमात सरपंच भुषण पोकळे यांच्या हस्ते मा. संजय घाडी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. गावाच्या सुपुत्राची मुंबई महानगरपालिकेच्या उपमहापौर पदापर्यंत वर्णी लागल्याबद्दल ग्रामस्थांनी अभिमान व्यक्त केला.

यावेळी सौ. संजना संजय घाडी, सुयश संजय घाडी, सरपंच भुषण पोकळे, पंचायत समिती सदस्य अंकुश ठुकरुल, उपसरपंच विश्वनाथ पडेलकर, माजी सरपंच विकास दीक्षित, ग्रामपंचायत सदस्य समिर हेमले, सिद्धेश्वर पाटणकर, तंटामुक्ती अध्यक्ष सुनिल बोडस, माहंबरे सर, सुभाष घाडी, चंद्रकांत तानवडे, नारायण बाणे, प्रकाश हेमले, महेश मणचेकर, दत्ताराम ध. वारीक, दत्ताराम भि. काशीराम वारीक, विजय वारीक, प्रशांत घाडी, प्रमोद चव्हाण, विनायक चव्हाण, गजानन घाडी, रमाकांत घाडी, राजेश घाडी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी वृंद व गावातील बहुसंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी मा. संजय घाडी यांच्या सामाजिक, राजकीय व लोकाभिमुख कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पडेल गावासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याची भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा