शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त हळद लागवडीचा शुभारंभ

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त हळद लागवडीचा शुभारंभ

*आ. वैभव नाईक यांच्या वतीने  २५ हजार हळद रोपांचे वाटप*

शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त कुडाळ मालवण मतदारसंघात आमदार वैभव नाईक यांच्या  माध्यमातून आज २५ हजार हळदीच्या रोपांचे वाटप करण्यात आले असून  आंब्रड जिल्हा परिषद मतदारसंघात हळद रोपांचे वाटप करून हळद लागवडीचा शुभारंभ आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत -पालव यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी घोटगे, सोनवडे, जांभवडे, कुपवडे, भरणी गावात हळद रोपांचे  वाटप करण्यात आले. हळद पिक हे शेतकऱ्यांना कमी मेहनती मध्ये अधिक उत्पन्न देणारे पिक  आहे. जास्तीत जास्त शेतकरी  हळद लागवडीकडे वळावे यातून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे या हेतूने आमदार वैभव नाईक यांनी  हा  उपक्रम राबविला आहे.

यावेळी घोटगे येथे चंदन ढवळ, अविनाश नाईक, बाळा गुरव, सुधीर भोसले, ज्ञानदेव धुरी, अनुसया ढवळ, प्रणाली ढवळ, अल्पेश तांबे, माही रेडकर, अंकिता घाडी,

भरणी येथे सरपंच प्रिया परब, उपसरपंच निशांत तेरसे, आत्माराम परब, अश्विनी परब, आबाजी सावंत, अनंत दळवी, सहदेव सावंत, बाबू मेस्त्री, अनंत परब, रघुनाथ काजरेकर

जांभवडे येथे कांचन पालव, तेजस भोगले, राजाराम सावंत, चंद्रशेखर राणे, शैलेश नाईक, गणेश सावंत

कुपवडे येथे शिवसेना  उपतालुकाप्रमुख महेश सावंत, दिंगबर सावंत, जनार्दन सावंत, तुकाराम सावंत, नारायण पाठक, पंकज सावंत, शरद सावंत

सोनवडे येथे सरपंच उत्तम बांदेकर, उपसरपंच वामन गुरव, दीपक घाडी, काशीराम घाडी, सिद्धेश घाडी, रुपेश घाडी, मॉजेस नाझारेन, आलेन्स डिसोजा, प्रसाद काणेकर, गुरु मेस्त्री, महेश घाडी, विजय कळसुळकर, बाबू पिरवटे, संदीप घाडी, विनोद घाडी, आदींसह शेतकरी उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा