You are currently viewing उद्या ओरोस येथे डीएड पदवीधर /एटीडी शिक्षक संघाच्या सभेचे आयोजन

उद्या ओरोस येथे डीएड पदवीधर /एटीडी शिक्षक संघाच्या सभेचे आयोजन

तळेरे

महाराष्ट्र राज्य डीएड पदवीधर /एटीडी शिक्षक संघ-जिल्हा सिंधुदुर्ग ची सभा रविवार दि. 20 मार्च 2022 रोजी उद्या सकाळी ठीक 10.30 वाजता ओरोस येथील माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात आयोजित केलेली आहे.
या सभेस महाराष्ट्र राज्य अध्यक्ष – श्री.दिलीप आवारे, सचिव श्री.महादेवराव माने सर व अन्य राज्य कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत .MEPS व आपले हक्क जाणून घेण्यासाठी डीएड’एटीडी शिक्षक बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष श्री.संजय जाधव व सचिव श्री.प्रशांत गोसावी यांनी प्रसिद्धी  पत्रका द्वारे केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा