You are currently viewing मळगांव इंग्लिश स्कूल प्रशालेचा निकाल 100%

मळगांव इंग्लिश स्कूल प्रशालेचा निकाल 100%

सावंतवाडी :

सावंतवाडी तालुक्यातील मळगांव ऐक्यवर्धक संघ मुंबई संचलित मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव या प्रशालेचा निकाल 100% लागला आहे. या प्रशालेत 90 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते.

यात प्रथम क्रमांक कुमारी निधी चंद्रकांत राऊळ 96.20% , द्वितीय क्रमांक कुमारी चैताली शंकर राऊळ 93.20%, तृतीय क्रमांक कुमारी याज्ञिका उमेश साटेलकर 91%, चतुर्थ क्रमांक कुमारी जान्हवी प्रभाकर अमरे 90% यांनी प्राप्त केला. या सर्व यशस्वीतांचे प्रशालेचे मुख्याध्यापक मारुती फाले, पर्यवेक्षक सुनील कदम, मळगाव ऐक्यवर्धक संघाचे अध्यक्ष शिवराम मळगांवकर, सचिव आर. आर. राऊळ, शाळा समिती चेअरमन मनोहर राऊळ, तसेच संस्था सर्व पदाधिकारी व शाळा समिती पदाधिकारी, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी ,माता पालक संघ, पालक शिक्षक संघ, माजी विद्यार्थी परिवार, पंचक्रोशीतील ग्रामस्थ व हितचिंतक यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा