You are currently viewing भाजपला पराभूत करणे सर्वांची जबाबदारी – नितीन बानगुडे पाटील

भाजपला पराभूत करणे सर्वांची जबाबदारी – नितीन बानगुडे पाटील

भाजपला पराभूत करणे सर्वांची जबाबदारी – नितीन बानगुडे पाटील :

देवगड येथे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा..

देवगड

लोकसभा निवडणूक ही देशाच्या आणि जनतेच्या तसेच भावी पिढीच्या भवितव्याची निवडणूक असून गद्दार विरुद्ध निष्ठावंत हुकूमशाही विरुद्ध लोकशाही भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारतीय जनता अशी निवडणूक असून या देशाच्या भवितव्यासाठी या निवडणुकीत भाजपला पराभूत करणे हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे येथील मतदारांना आपल्या मतांची किंमत कळेल तेव्हा मतदार हा राजा असेल असे प्रतिपादन शिवसेना नेते नितीन बानगुडे पाटील यांनी देवगड येथील जाहीर सभेत बोलताना केले.

महाविकास (इंडिया)आघाडी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय उमेदवार खास.विनायक राऊत ,यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते नितीन बानगुडे पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन देवगड येथे करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते,गौरीशंकर खोत,जिल्हा प्रमुख सन्देश पारकर,सतीश सावंत,युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,अतुल रावराणे,आम आदमी जिल्हा प्रमुख विवेक ताम्हणकर,संदीप कदम,राष्ट्रीय काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर,
तालुका अध्यक्ष उमेश कुळकर्णी,सूरज घाडी, सजाउद्दीन सोलकर,ऍड प्रसाद करंदीकर,तुषार भाबल
: महिला उपजिल्हा संघटक, पूर्वा सावंत तालुका प्रमुख मिलिंद साटम युवासेना तालुका प्रमुख गणेश गावकर जिल्हा शिवसेना महिला संघटक हर्षा ठाकूर,राष्ट्रवादी महिला अध्यक्ष नयना आचरेकर,व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
या निमित्ताने युवा तालुका प्रमुख गणेश गावकर,ऍड प्रसाद करंदीकर,सतीश सावंत,युवक जिल्हा अध्यक्ष किरण टेंबुलकर,सुशांत नाईक,संदिप कदम,स्वप्नील धुरी,यांनी संबोधित केले.
यापुढे बोलताना नितीन बानगुडे पाटील म्हणाले भाजपच्या हुकूमशाहीला सुरुंग या महाराष्ट्रातूनच लागणार असून हा संघ ठाकरे सेनाच सेना लावेल.ही लढाई गद्दार विरुद्ध निष्ठावंत अशी आहे. कोकण भूमी ही निसर्ग संपन्न स्वर्ग असून देशाला सर्व क्षेत्रात संपन्नता कोकणात दिली आहे सुसंस्कृत राजकारण महाराष्ट्राचे एक वेगळी ओळख आहे,भाजपाने शिवसेनेला संपू पाहत आहे गद्दारानी शिवसेना फोडली पक्ष चिन्ह पळविले तरीदेखील ज्यावेळी मतांची किंमत कळणार आहे तेव्हाच मतदार हा राजा असेल असे सांगून या गद्दारांना या मतदानातून ताकद लोकसभा निवडणुकीत दाखवण्याची वेळ आली आहे, मतदान हीच या लोकशाहीची खरी ताकद असून कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला यापूर्वी होता. आजही आहे यापुढे राहील अशा विश्वास व्यक्त करून शिवसेनेला संपविण्याची संपविण्याची भाषा करणारे पुष्कळ पाहिले पण आजही शिवसेना तेवढीच खंबीरपणे उभी आहे. या देशातील सरकारने येथील सुशिक्षित बेरोजगार यांना बेरोजगारीच्या खाईत लोटले असून या देशातील उद्योजक दुसऱ्या देशात जात आहेत. ही बाब अतिशय गंभीर असून त्या देशाचे भवितव्य घडवायचे असेल तर भाजपचा पराभव हा महत्त्वाचा आहे येथील शेतकऱ्यावर बेरोजगारावर आत्महत्या करण्याची पाळी येत आहे. देशातील सरकारने निव्वळ घोषणा केल्या काळे धन आणणार प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये ह्या निव्वळ घोषणा ठरल्या. देश आत्मनिर्भर बनविणार अशी घोषणा करणारे देशात विरोधी पक्ष संपून फक्त एक पक्ष एक देश असे धोरण आणण्याचा प्रयत्न करत आहे. एकाच वेळी १४६ खासदाराचे निलंबन करणे म्हणजे हुकूमशाही कडे हा देश जात असल्याचं उदाहरण आहे.असेही त्यांनी नमूद केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणावर प्रेम केले अधिका अधिकचा काळ हा त्यानी कोकणात घालवला या कोकणची संपन्नता वाढविणारा खासदार आपल्याला हवा असून गेली दहा वर्ष खासदारकी च्या कारकीर्दीत कोकण विकासासाठी खासदार विनायक राऊत त्याच प्रेरणेने काम करीत आहेत. न्याय देणार कोकण न्याय देण्याला विकास व त्यासाठी आवश्यक असणारी श शांतता या कोकणात नांदने महत्त्वाचे आहे २०३६ साली देशाला खऱ्या अर्थाने महासत्ता बनवायचे असेल तर २०२४ लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव हा महत्त्वाचा आहे .मराठी माणसांची मुंबई गुजराती मारवाडी यांच्याकडे जात आहे. कोकणात विनाशकारी प्रकल्प आले होते या विनाश कारी प्रकल्पांना खऱ्या अर्थाने शिवसेनेने विरोध करून हाकलून लावले या लोकसभा निवडणुकीत देखील विनायक राऊत यांचे हात बळकट करण्याकरता विजयाची सुतारी घेऊन आम्ही फिरत आहोत .त्यासाठी सर्व जाती धर्म ती लोकांनी एकत्रित येऊन महाराष्ट्र पण जपण्यासाठी ठामपणे पाठीशी उभे राहायचे आहे. असे सांगून खासदार विनायक राऊत असो अथवा आमदार वैभव नाही का असो त्यांच्या धमन्यातून एकच आवाज येईल जय महाराष्ट्र त्यामुळे ही निवडणूक गद्दाविरुद्ध निष्ठावंत असे असून त्यांच्या पाठीशी उभे र राहिले तरच लोकशाहीचे खऱ्या अर्थाने सामर्थ्य वाढेल. उद्धव ठाकरे यांनी आपल्या

प्रतिक्रिया व्यक्त करा