You are currently viewing कार्यकर्त्यांचे जीवन हे कंदिलाच्या काचेप्रमाणे असते!” – मिलिंद परांडे

कार्यकर्त्यांचे जीवन हे कंदिलाच्या काचेप्रमाणे असते!” – मिलिंद परांडे

*”कार्यकर्त्यांचे जीवन हे कंदिलाच्या काचेप्रमाणे असते!” – मिलिंद परांडे*

पंढरपूर

“कार्यकर्त्यांचे जीवन हे कंदिलाच्या काचेप्रमाणे असते!” असे विचार विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी लोटस इंग्लिश मीडियम स्कूल, जुना कासेगाव रोड, पंढरपूर येथे रविवार, दिनांक ०७ मे २०२३ रोजी व्यक्त केले. विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत आयोजित ‘मातृशक्ती अभ्यास वर्ग २०२३’ या उपक्रमाच्या समारोप प्रसंगी मिलिंद परांडे बोलत होते. विश्व हिंदू परिषद मार्गदशक मंडळ सदस्य ह. भ. प. वासुदेवमहाराज चवरे, प्रांत उपाध्यक्ष माधवी संशी, प्रांत सहमंत्री ॲड. सतीश गोरडे, प्रांत संयोजिका ॲड. मृणालिनी पडवळ, सह सत्संग प्रमुख नटराज जगताप, समरसता सहप्रमुख बापूसाहेब भोळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

मिलिंद परांडे पुढे म्हणाले की, “काच स्वच्छ असेल तर आतली ज्योत आणि प्रतिमा दिसते. ही काच पुन्हा पुन्हा स्वच्छ करावी लागते. ही ज्योत म्हणजे विश्व हिंदू परिषदेची विचारधारा होय. जात, धर्म, भाषा, प्रांत या सर्व भेदांच्या पलीकडे जाऊन विश्व हिंदू परिषदेची विचारधारा एक आहे. एक हिंदू कार्यकर्ता म्हणून जगण्याची ही विचारधारा आहे. मातृभूमी, धर्मविचार, संस्कृती या तीन गोष्टी समान आहेत!”

दिनांक ०४ मे ते ०७ मे २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘मातृशक्ती अभ्यास वर्ग २०२३’ या उपक्रमात पस्तीस वर्षांच्या पुढे आणि पासष्ट वर्षांच्या आतील सुमारे बावन्न महिलांनी सहभाग घेतला होता. प्रामुख्याने कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे ग्रामीण, पुणे पूर्व, पुणे पश्चिम, नगर, नाशिक या विभागातील महिलांचा यांमध्ये समावेश होता.‌

अभ्यास वर्गात मनाच्या विकासासाठी विविध विषयांवरील बौद्धिक सत्रे, स्त्रीच्या आत्मसन्मान आणि व्यक्तिमत्त्व विकास या विषयांवरील चर्चासत्रे, सद्य परिस्थितीतील विविध सामाजिक सामाजिक विषयांवर मार्गदर्शन, बालसंस्कार केंद्र आणि सत्संग या विषयांवरील कृतिसत्रे; तसेच व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपस्थित मातृशक्तींच्या सुप्त गुणांना वाव देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

वर्गाचे उद्घाटन विश्व हिंदू परिषद प्रांत अध्यक्ष डॉ. पांडुरंग राऊत, प्रांत संघटन मंत्री अनिरुद्ध पंडित, प्रांत मंत्री संजय मुरदाळे, प्रेमलता बब्रुवाहन रोंगे व्हाईस चेअरमन विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेणूनगर, विश्वस्त श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव एज्युकेशन पंढरपूर, उपाध्यक्ष माधवी संशी,
जिल्हा मंत्री डॉ. जयसिंग पाटील, प्रांत संयोजिका ॲड. मृणालिनी पडवळ, मातृशक्ती सहसंयोजिका शारदा रिकामे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थितीत झाले. याप्रसंगी पांडुरंग राऊत यांनी वर्गास मार्गदर्शनपर शुभेच्छा दिल्या. ‘विश्व हिंदू परिषद : स्थापना व उद्देश’ या विषयावर प्रांत संघटनमंत्री अनिरुद्ध पंडित यांनी विचार व्यक्त केले.

संजय मुरदाळे यांनी ‘मातृशक्ती कुटुंब प्रबोधन’ या विषयावर मार्गदर्शन केले. ॲड. वर्षा डहाळे यांनी ‘लव जिहाद’ , श्रीरंग राजे यांनी ‘कार्यकर्ता’ , अभय उत्पात यांनी ‘पर्यावरण’ या विषयांवर प्रबोधन केले.‌ शारदा रिकामे आणि प्रिया रसाळ यांनी बालसंस्कार केंद्राविषयी माहिती दिली. कृतिसत्रात कल्पना क्षीरसागर यांनी सीताचरित्र आणि चारित्र्य या विषयावर मार्गदर्शन केले.

विभाग मंत्री डॉ. जयसिंह पाटील, बापूराव भोळे, रवींद्र साळे, रमाकांत देशपांडे, भाग्यश्री लिहिणे, मालती गंभीर, रश्मी पुंज, रामेश्वर कोरे, वालचंद जामदार, संतोष पापरीकर, गंगाधर कोळी, आदेश कांबळे, कृष्णा जामदार, आशा वाणी, रेवती हणमसागर, शीतल भोसले, प्रज्ञा सावंत, भक्ती साळवी, विजया रणभोर यांनी संयोजनात सहकार्य केले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

 

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 1 =