You are currently viewing जिल्हा बँकेसाठी ९८.६७ टक्के मतदान; ९८१ पैकी ९६८ जणांनी मतदानाचा बजावला हक्क

जिल्हा बँकेसाठी ९८.६७ टक्के मतदान; ९८१ पैकी ९६८ जणांनी मतदानाचा बजावला हक्क

३९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

संपुर्ण राज्याचे लक्ष लागुन राहिलेल्या बहुचर्चित व आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीच्या १९ जागांसाठी गुरूवारी ९८.६७ टक्के मतदान झाले असुन ९८१ पैकी ९६८ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. भाजपचे सिद्धिविनायक पॅनेलचे राजन तेली व महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनेलचे सतीश सावंत यांच्यासह सहकार क्षेत्रातील ३९ दिग्गज उमेदवारांचे भवितव्य मतपेटी बंद झाले आहे. अत्यंत प्रतिष्ठेची बनलेल्या सहकार क्षेत्रातील या निवडणुकीत कोण विजयी होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागुन राहीले आहे. दरम्यान या निवडणुकीचा निकाल शुक्रवार ३१ डिसेंबर रोजी ओरोस येथे सकाळी ९ वाजल्यापासून जाहीर होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक आज गुरुवार 30 डिसेंबर रोजी पार पडली या निवडणुकीमध्ये कुडाळ, दोडामार्ग, मालवण या ठिकाणी शंभर टक्के मतदान झाले तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील झालेले मतदानामध्ये कुडाळ २१३ (१०० टक्के), मालवण ११० (१०० टक्के) दोडामार्ग ४८ (१०० टक्के), कणकवली १६५ पैकी १६१ जणांनी मतदान केले (९७.५८ टक्के ), सावंतवाडी २१२ पैकी २११ जणांनी मतदान केले (९९.५३ टक्के), वैभववाडी ५४ पैकी ५३ जणांनी मतदान केले (९८.१५ टक्के), वेंगुर्ले ९६ पैकी ९१ जणांनी मतदान केले (९४.७९ टक्के), व देवगड ८३ पैकी ८१ जणांनी मतदान केले (९७.५९ टक्के) अशा प्रकारे मतदान झाले.

दि. ३१ रोजी सिंधुदुर्गनगरी येथे मतमोजणी

सिंधुदुर्ग नगरी येथील माध्यमिक शिक्षक पतपेढी येथे दि. ३१ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यासाठी ८ टेबल मांडण्यात आली असुन ८ फेरीत मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत भाजपचे सिद्धिविनायक पॅनेल राजन तेली तर महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनेल सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली खाली लढत आहे. दोन्हीही पॅनलमध्ये बँकेचे आजी, माजी संचालक आहेत.
सिद्धिविनायक पॅनेलचे विठ्ठल देसाई, राजन तेली, प्रकाश मोर्ये , प्रज्ञा ढवण, अस्मिता बांदेकर, सुरेश चौकेकर, रवींद्र मडगावकर, गुलाबराव चव्हाण, गजानन गावडे, अतुल काळसेकर, महेश सारंग, संदीप परब, समीर सावंत, कमलाकांत कुबल, गुरुनाथ पेडणेकर, प्रकाश गवस, प्रकाश बोडस, दिलीप रावराणे, व मनीष दळवी हे उमेदवार आहेत.

सुभाष मडव हे एकच अपक्ष उमेदवार कुडाळ मतदार संघातुन आहेत.

समृद्धी पॅनेलचे सतीश सावंत, सुशांत नाईक, विद्याप्रसाद बांदेकर, नीता राणे, अनोरोजीन लोबो, आत्माराम ओटवणेकर, मनिष पारकर, मेघनाथ धुरी ,सुरेश दळवी, मधुसूदन गावडे, लक्ष्मण आंगणे, मधुसुदन गावडे, विनोद मर्गज, विकास सावंत, व्हिक्टर डान्टस, गणपत देसाई, विद्याधर परब, अविनाश माणगावकर, दिगंबर पाटील व विलास गावडे हे उमेदवार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 4 =