You are currently viewing कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी विशेष वार्षिक सर्वसाधारण सभा ३० एप्रिल रोजी

कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी विशेष वार्षिक सर्वसाधारण सभा ३० एप्रिल रोजी

सावंतवाडी

कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी विशेष वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या दि.३० एप्रिल रोजी सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूल च्या सभागृहात दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
साहित्य चळवळ सावंतवाडी तालुक्यात वाढवण्याच्या दृष्टीने या वर्षभरात विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत त्यानुसार कोमसाप आपल्या गावी त्याचबरोबर पुस्तकी गाव असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येणार आहेत. याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती कोमसाप चे तालुकाध्यक्ष अध्यक्ष अँड संतोष सावंत यांनी दिली.

कोमसाप सावंतवाडी शाखेची कार्यकरणी ची बैठक गुरुवारी पालिकेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहातील कक्षात घेण्यात आली यावेळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व भगवान महावीर यांना अभिवादन करण्यात आले.
या बैठकीत कोमसाप सावंतवाडी शाखेचे सर्व सदस्यांना एकत्रित करून कोमसाप च्या माध्यमातून साहित्य व समाज सेवा चळवळ अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने सर्व सदस्यांची विशेष सर्वसाधारण सभा घेण्याचे ठरले यानुसार येत्या ३० एप्रिल रोजी विशेष सर्वसाधारण सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले त्यानुसार राणी पार्वतीदेवी हायस्कूल मध्ये दुपारी ३ वाजता विशेष सर्वसाधारण सभा घेण्याबाबत निश्चित करण्यात आले तसेच साहित्य चळवळ वाढीच्या दृष्टीने कोमसाप आपल्या गावी व गाव तेथे कोमसाप असा नावीन्यपूर्ण उपक्रमात लेखक कवी साहित्यिक पत्रकार प्रगतिशील शेतकरी समाजसेवक डॉक्टर वकील अशा विविध क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व यांना कोमसाप मार्फत गावात जाऊन शाळेत भेट कार्यक्रम उपक्रम राबवण्यात येणार आहे.
तसेच मालवणी भाषा टिकवण्याच्या दृष्टीने उपक्रम मराठी भाषा दिन लेखक कवी साहित्यिक यांचे पुस्तक प्रकाशन व नवोदित साहित्यिकांसाठी उपक्रम बाल व युवा साहित्य संमेलन येण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आधी विविध विषयावर चर्चा झाली.

यावेळी ज्येष्ठ कवयित्री उषा परब यांनी कादंबरी लिहिली आहे.या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे त्याबद्दल त्याचा अभिनंदन ठराव घेण्यात आला सावंतवाडी होणाऱ्या जनवादी साहित्य संस्कृती संमेलन ला कोमसापच्या पूर्ण पाठिंबा सहकार्य असणार आहे असे स्पष्ट करण्यात आले. यावेळी विविध विषयावर चर्चा झाली यावेळी कवयित्री सौ उषाताई परब, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सचिव प्रतिभा चव्हाण, सहसचिव राजू तावडे खजिनदार डॉ.दीपक तुपकर ,प्रा.रुपेश पाटील तकीलदार सलीम, दीपक पटेकर, विनायक गावस आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांचे आभार सौ चव्हाण यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा