You are currently viewing संघर्ष माझा !!माझ्याचं शब्दांशी…!!

संघर्ष माझा !!माझ्याचं शब्दांशी…!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*संघर्ष माझा !!माझ्याचं शब्दांशी…!!*

 

मोहापोटी जपलेले शब्द

माझीच लाज काढतात

तुझा पसारा किती…रे

पोत माझी ठरवतात…

 

नात संवादी करण्यास

शब्दांचा वापर करतोस

आशय अनुभव अभिव्यक्तींची

कुवतच निवेदनात घालवतोस..

 

स्वतःची लय शोधतांना

शब्दांची परेड घेतोस

भाषिक अभिव्यक्ती दाखवून

क्रियापदे धुसर करतोस..

 

कानेकोपरे सूक्ष्मकंगोरे शोधत

आशयातून शब्दांना छळतोस

प्रतिमा दृष्टांत उपमांनी

शब्दांवर मालकी दाखवतोस..

 

भावावस्थेत मनातील अनुभव

प्रांजलतेने उपसत जातोस

तर्जुम्यातील शब्दरचनेचं प्रतिबिंब

चैतन्ययुक्त संवेदनशील करतोस..

 

संघर्ष माझामाझ्याचं शब्दांशी

कलात्मक अलिप्तता ढळते

मोहापोटी संघर्ष शब्दांशी

आत्मसन्मानाची पळवाट ठरते..

आजही संघर्ष माझा……

माझ्याच…शब्दांशी……!!

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा