You are currently viewing प्रदिप मोरे यांना ‘ संजीवनीचा शब्द शिल्प पुरस्कार ‘ जाहीर

प्रदिप मोरे यांना ‘ संजीवनीचा शब्द शिल्प पुरस्कार ‘ जाहीर

*प्रदिप मोरे यांना ‘ संजीवनीचा शब्द शिल्प पुरस्कार ‘ जाहीर .*

नायगाव
नायगाव बु ॥ येथिल प्रा. प्रदिप मोरे यंदाचा संजीवनी संस्थेचा ‘ शब्द शिल्प काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आला असून दि. ६ जून रोजी ‘ एका सोहळ्यात सदर पुरस्कार माधवराच्या ‘ हस्ते प्रदान करण्यात येणार आहे .
श्री शिवाजी विदयालयाचे कार्यकारी संचालक ‘ तथा मुख्याध्यापक ‘ श्री प्रदिप अच्युतराव मोरे . शिवाजी नगर रा . नायगाव बु ॥ हमु चिखली . यांना यवर्षीचा संजीवनी बहु . शिक्षण प्रसारक संस्था केळवद ता चिखली या ‘ महाराष्ट्र शासन पुरस्कार ,प्राप्त संस्थेचा सन्मानाचा साहित्य सेवेचा ‘ शब्द शिल्प काव्य पुरस्कार ‘ संस्था अध्यक्ष ‘ डॉ . निवृत्तीभाऊ जाधव यांनी जाहीर केला आहे . या संस्थेच्या व्दारे विविध क्षेत्रातील मान्यवराचा पुरस्कार देवून गौरव केला जातो . प्रदिप मोरे हे गेल्या २० वर्षापासून साहित्य सेवा करीत आहे . ‘ शिंपले मोती ‘ हा साहित्य चळवळी साठी चालविले मासिक अंक . व त्याचे संपादन केले असून विदर्भ साहित्य संघाचा राज्य स्तरीय काव्यलेखन पुरस्कार ‘ दै. लोकसत्ता ‘ लेखन ‘ पुरस्कार ‘ साहित्य कुंज ‘ पुरस्कार खामगांव . तसेच स्व . हरणे राज्य स्तरीय काव्य पुरस्कार आणि पुणे येथिल साहित्य कलायात्री ‘ अक्षर कुंज ‘ राज्यस्तरीय पुरस्कार . तसेच जीवन ज्योती काव्य पुरस्कार आदी मिळाले असून प्रदिप मोरे उज्जैनकर फाऊंडेशन मुक्ताईनगर जि. जळगाव शाखा बुलढाणा चे सहसचिव म्हणून कार्यरत आहेत . तर ममता एनजीओ फेडरेशनचे ते जिल्हा सदस्य आहेत . विविध काव्य साहित्य मेळाव्यात त्यांचा उत्फुर्द सहभाग असून ‘ सामाजिक कार्या बरोबरच त्याचा साहित्य प्रवासही सुरु आहे . सदर पुरस्कार मिळाल्यामुळे त्याच्या वर चाहत्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा