You are currently viewing २२ जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

२२ जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

कुडाळ / प्रतिनिधी :

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या वाढदिवसनिमित्त २२ जुलैला जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सिंधुदूर्ग जिल्ह्यात विविध सामाजिक, शैक्षणीक उपक्रम राबविले जाणार आहेत.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या वाढदिवसनिमित्त २२ जुलैला वाढदिवस आहे. याबाबत बोलताना श्री. सुद्रिक म्हणाले अजिदादांचा वाढदिवस दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध सामाजिक, शैक्षणीक, आरोग्य, अशा उपक्रमांनी सामाजिक बांधिलकी जोपासून साजरा करत असतो. आज ते राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यामुळे राज्यासह आपल्या सिंधुदूर्ग जिल्हाचा सर्वांगीण विकास होणार आहे. अशा या आपल्या नेत्यांचा वाढदिवस तेवढ्याच दिमाखात साजरा करण्यासाठी युवा वर्ग सरसावला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवितानाच वृक्ष संवर्धन काळजी गरज ओळखून ” झाडे लावा झाडे जगवा ” हा संदेश देत वृक्ष वाटप, वृक्ष लागवड, शालेय मुलांना शैक्षणीक साहित्य वाटप तसेच आरोग्य शिबिर अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी जिल्हा युवक जिल्हाध्यक्ष श्री.प्रफुल्ल सुद्रीक यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा