You are currently viewing साहित्य विश्वातील अनोखे कवी संमेलन

साहित्य विश्वातील अनोखे कवी संमेलन

“कवी झाडावर, कविता पर्यावरणावर”संपन्न

पिंपळे गुरव-(प्रतिनिधी)

शब्दधन काव्य मंच, दिलासा साहित्य सेवा संस्था, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण विषयक कवी संमेलन आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात शोभा जोशी यांच्या वृक्ष प्रार्थनेने करण्यात आली. वृक्ष आरती करण्यात आली. हभप अशोक गोरे यांनी संत तुकाराम यांचे वृक्ष वल्ली आम्हा या अभंगाने वातावरण निर्मिती केली.
वसुंधरा प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष श्री. तानाजी एकोंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात मा.विकास कुचेकर, अण्णा जोगदंड, हास्यकवी अनिल दिक्षित, मनीष कदम, सचिन काशीद, रमेश तांबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


श्री. सुभाष चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. श्री. सुरेश कंक यांच्या संकल्पनेतून आकारात आलेल्या या आगळ्यावेगळ्या कविसंमेलनात ज्येष्ठ कवी बाबू डिसोजा, सुमन दुबे, सीमा गांधी, मधुश्री ओव्हाळ, डॉ. पी एस अगरवाल, संगीता झिंझुरके, अशोक कोठारी, शोभा जोशी, फुलवती जगताप, जयश्री गुमास्ते, आत्माराम हारे, मयुरेश देशपांडे आदि कवींनी पर्यावरण विषयक आपल्या कविता सादर केल्या.
मुरलीधर दळवी, संगीता जोगदंड, नंदकुमार कांबळे, सौ. माधुरी वैद्य डिसोजा यांनी संमेलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रदीप गांधलीकर यांनी केले. श्री. शामराव सरकाळे यांनी आभार प्रदर्शन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा