चिंदर येथील तरुणांची आत्महत्या

चिंदर येथील तरुणांची आत्महत्या

मालवण

चिंदर देऊळवाडी येथील रॉबिन ड्रॉमनिक लोबो या तीस वर्षीय विवाहित तरुणाचा मृतदेह चिंदर येथील चर्चच्यामागे आंब्याच्या झाडाला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास लावलेल्या स्थितीत शनिवारी सकाळी आढळून आला असून या घटनेची खबर त्याचे काका जुजे जेरॉन लोबो यांनी आचरा पोलीस स्टेशनला दिली आहे.

आचरा पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार रॉबिन लोबो हा शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घरातून निघून गेला होता. तो रात्री उशीरा पर्यंत न आल्याने त्याची शोधाशोध केली असता तो शुक्रवारी सापडला नव्हता म्हणून आज पुन्हा त्याच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली असता तो चिंदर येथील चर्च च्या मागील आंब्याच्या झाडास गळफास घेतलेल्या स्थितीत आढळुन आला. सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल संदीप कांबळे करत आहेत. रॉबिनच्या पश्चात पत्नी , मुलगा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा