You are currently viewing कणकवलीत दुय्यम निबंधक कार्यालयातील लाईटच्या बोर्डला आग…

कणकवलीत दुय्यम निबंधक कार्यालयातील लाईटच्या बोर्डला आग…

कणकवली

कणकवली दुय्यम निबंधक कार्यालयात आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास विद्युत बोर्डला अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ती आग ताबडतोब पाणी मारुन आटोक्यात आणण्यात आली. मात्र या घटनेमुळे दस्त नोंदणीचे काम काही ठप्प झाले आहे. विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. या घटनेत दुय्यम निबंध कार्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे.आग ताबडतोब आटोक्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

प्रतिक्रिया व्यक्त करा