You are currently viewing 8 फेब्रुवारी पासून तुमचं व्हॉट्सऍप अकाऊंट कायमचं बंद होईल

8 फेब्रुवारी पासून तुमचं व्हॉट्सऍप अकाऊंट कायमचं बंद होईल

जगातील सर्वात मोठा मेसेंजर असलेल्या व्हॉट्सअपने नुकताच आपल्या प्रायवसी पॉलिसीमध्ये मोठा बदल केला आहे. या बदलाशी सहमती न दर्शवल्यास येत्या 8 फेब्रुवारीपासून तुम्हाला व्हॉट्सअप वापरता येणार नाही.

फेसबुकने व्हॉट्सअप विकत घेतल्यानंतर त्यात मोठे बदल केले आहेत. यामध्ये आता व्हॉट्सअप मोठ्या प्रमाणात तुमचा डाटा फेसबुकसोबत शेअर करणार आहे. व्हॉट्सअप यापुढे वापरायचं असेल तर या बदलाला तुम्हाला सहमती द्यावी लागणार आहे.

नव्या नियमामुळे व्हॉट्सअप यूझर्सची अधिकाधिक माहिती साठवून ती फेसबुकसोबत शेअर करु शकते. तुमची आर्थिक माहिती, नाव, लोकेशन, फोन नंबर, ईमेल आयडी, तुमच्या सवयी आदी गोष्टी व्हॉट्सअप फेसबुकसोबत शेअर करु शकते.

दरम्यान, व्हॉट्सअपच्या नव्या नियमामुळे या क्षेत्रातील जाणकार तसेच तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक यूझर पर्यायी मेसेजिंग प्लॅटफॉर्मकडे वळू शकतात, असंही मानलं जातंय.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + fifteen =