You are currently viewing शिवराज्याभिषेक दिनाच्या स्वागताध्यक्ष पदी प्राचार्य व्ही. टी. इंगोले यांची निवड.

शिवराज्याभिषेक दिनाच्या स्वागताध्यक्ष पदी प्राचार्य व्ही. टी. इंगोले यांची निवड.

अमरावती

येत्या जून महिन्यात ०६ तारखेला छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन आहे. तसेच दि. १२ जूनला राष्ट्रमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी आहे. हा सुवर्णमध्य साधून अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख अकादमीने मिशन आयएएस अंतर्गत सात दिवसांच्या राष्ट्रीय स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिराचे आयोजन मार्डी रोड वरील ग्रीन सर्कल येथे केलेले आहे .स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या व करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे संस्कार शिबिर उपयुक्त असणार आहे .या शिबिराच्या उद्घाटनाच्या दिवशी छत्रपती श्री शिवाजी महाराज जीवन व कार्य हे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्रा. डॉ. शोभा गायकवाड यांनी लिहिलेले पुस्तक प्रकाशित होणार आहे .याशिवाय स्पर्धा परीक्षावरील इतर तीन पुस्तके शिवराज्याभिषेक दिनानिमित्त प्रकाशित होणार आहेत. या शिवराज्याभिषेक दिनाच्या स्वागताध्यक्षपदी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ संशोधक व पुण्याच्या पीआयसीटी या संस्थेचे सेवानिवृत्त प्राचार्य व लेखक प्रा. डॉ. व्ही टी इंगोले यांची निवड करण्यात आली आहे . प्रा डॉ व्ही टी इंगोले अमरावतीचे सुपुत्र असून त्यांनी आतापर्यंत जवळपास 40 पेटंट मिळविले आहेत .याशिवाय त्यांनी व त्यांच्या चमूने संशोधन करून सालबर्डीच्या परिसरात असलेले अजिंठा वेरूळ सारख्या दर्जाच्या अश्मयुगीन चित्रगुहा शोधून काढल्या आहेत. त्यावर अमरावती विद्यापीठामध्ये रितसर एक दालन प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यांचे हे संशोधन सध्या जागतिक पातळीवर चर्चेत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्याभिषेक ते राष्ट्रमाता जिजाऊ पुण्यतिथी दिनानिमित्त या सात दिवसात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या सात दिवसाच्या शिबिरात भारतातील व महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेतील तज्ञ सहभागी होणार आहेत.
विदर्भातील स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या संस्कार शिबिरामध्ये बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन या शिबिराचे संयोजक व स्पर्धा परीक्षा तज्ञ प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
==============
प्रकाशनार्थ.
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे.
संचालक .डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी .अमरावती

प्रतिक्रिया व्यक्त करा