You are currently viewing पटकीदेवी ते नागवे रस्त्याचे काम पंधरा दिवसात करा अन्यथा आंदोलन छेडू

पटकीदेवी ते नागवे रस्त्याचे काम पंधरा दिवसात करा अन्यथा आंदोलन छेडू

सार्वजनिक बांधकाम विभागाला कणकवली शहर भाजपाचा इशारा

त्रिपुरारी पौर्णिमेपूर्वी पटकी देवी ते स्वयंभू मंदिर पर्यंत काम तातडीने मार्गी लावा

कणकवली

कणकवली ते नागवे करंजे हा १९ कि.मी. चा रस्ता गेली अनेक वर्षे नादुरूस्त आहे. पटकीदेवी मंदिर ते स्वयंभू मंदिर पर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. त्यामुळे सदर रस्त्यावरून चालणे व वाहतूक करणे अतिशय धोक्याचे झाले आहे. गेली दोन – तीन वर्षे सतत आपल्या कार्यालयाकडे तक्रार देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. मलमपट्टी करून लोकांच्या डोळ्यात धूळ फेकली जात आहे. त्रिपुरारी पौर्णिमेच्या अगोदर या रस्त्याची तातडीने डागडुजी करावी व येत्या पंधरा दिवसात लगेचच हे काम सुरू करावे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा कणकवली शहर भाजपच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आला आहे.

उपकार्यकारी अभियंता के. के. प्रभू यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे, सदर रस्त्याचे नगरपंचायतच्या डीपीवर 12 मीटर रुंदीकरण आहे . तथापि आज रोजी हा रस्ता ९ मीटर संदीकरणाने करण्यात येऊन हा रस्ता किमान १५ वर्षे टिकेल असा करण्यात यावा. त्याचप्रमाणे सदर रस्त्यावर काही लोकांनी अतिक्रमण केलेले आहे ते हटविण्यात यावे. तरी याबाबत येत्या १५ दिवसांत सदर रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरण / गटार चे काम न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपाच्या वतीने देण्यात आला आहे. दरम्यान या संदर्भात कणकवली नगराध्यक्ष यांनी देखील नुकतेच आमदार नितेश राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले होते. सुमारे सहा कोटींचा निधी या कामासाठी मंजूर करण्याचे आश्वासन आमदार नितेश राणे यांना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले होते. त्यानुसार या कामाच्या पुढील प्रक्रिये बाबत अधिकाऱ्यांनी काय माहिती घेतली असा सवाल देखील यावेळी उपस्थित करण्यात आला. दरम्यान याबाबत उपकार्यकारी अभियंत्याने लवकरात लवकर हे काम मार्गी लावण्याची ग्वाही दिल्याची माहिती भाजपा कडून देण्यात आली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक शिशीर परुळेकर, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, सुशील पारकर, जावेद शेख, राकेश वालावलंकर आदी उपस्थित होते.

Advt

_*प्रवेश सुरू ..! प्रवेश सुरू …!! प्रवेश सुरू ..!!!*_🏃‍♀️🏃‍♂️

*_♻️ ADMISSION OPEN ♻️_*

_*🏥 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL*_

*_📕शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये 💊औषध निर्माणशास्त्र पदविका व पदवी 🏥 D.PHARM & B.PHARM प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता 🏥 प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !_*

*_👉 आमच्या संस्थेची वैशिष्ट्ये_*

*_📕🔭अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा व ग्रंथालय_*

*_🖥️अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेट सुविधा_*

*_👩🏻‍🏫अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग_*

*_👨🏻‍🎓माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू_*

*_रजिस्ट्रेशन फॉर्म 📋भरून देण्याची मोफत सुविधा तसेच F.C. सेवा उपलब्ध*

*_🌴🏥🌴निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव राज्य मार्ग. लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत_*

_*प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*_

*📲9763824245 /9420196031*

*_👉पत्ता : व्हि.पी. कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव राज्यमार्गालगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_*

*Advt link*

———————————————-
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − 5 =