You are currently viewing देवगड-निपाणी रस्त्याची परिस्थिती दयनीय

देवगड-निपाणी रस्त्याची परिस्थिती दयनीय

आठ दिवसात रस्ता ठिक न झाल्यास अजित नाडकर्णी यांचा आंदोलनाचा इशारा

देवगड निपाणी रस्त्यावर असंख्य खड्डे पडले असून त्या खड्यातुन वाहनांना वाट काढावी लागत आहे फोंडाघाट येथील रस्त्यांची सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे.याला वाली कोण? असा सवाल अजित नाडकर्णी यांनी पत्रकाद्वारे विचारला आहे. इकडे लक्ष देणे गरजेचे आहे.अजित नाडकर्णी यांनी सार्वजनीक बांधकाम खात्याला निवेदन सादर केले आहे. यात ८ दिवसात रस्ता ठिक झाला नाही तर ६ तारीख ला सर्वपित्री अमवास्येला रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

सर्व हवेली वासीय या आंदोलनात सहभागी होणार असून होणाऱ्या सर्व परीणामाला कणकवली सार्वजनीक बांधकाम खाते जबाबदार असणार आहे. तो पर्यंत हवेलीनगर साई मंदीर ते आय.टी.आय पर्यंत रस्ता ठीक करावा. आमदार नितेशजी राणे व पालकमंत्री यांना निवेदनाच्या प्रती देवुन रस्त्याबाबत दाद मागितली जाणार आहे. या सर्व बेजबाबदार पणा मुळे रोज 1अपघात होत आहे व या अपघातांना प्रशासन जबाबदार असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे अजित नाडकर्णी यांनी कळवले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + 9 =