You are currently viewing करूळचे सुपुत्र डी. डी. कोलते यांना कर्तव्यदक्ष अधिकारी गौरव पुरस्कार प्राप्त…

करूळचे सुपुत्र डी. डी. कोलते यांना कर्तव्यदक्ष अधिकारी गौरव पुरस्कार प्राप्त…

वैभववाडी

करूळ गावचे सुपुत्र डी. डी. कोलते यांना राज्यस्तरीय कर्तव्यदक्ष अधिकारी गौरव पुरस्कार २०२१ ने गौरविण्यात आले आहे. कोल्हापूर येथील पाखरे-जी चँरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून श्री. कोलते यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, वास्तुशास्त्र महाविद्यालयात रजिस्टार या पदावर ते कार्यरत आहेत. या ग्रुप मध्ये त्यांची ३२ वर्ष सेवा पूर्ण झाली आहे. प्रामाणिकता, कर्तव्यतत्परता, निष्ठा या भावनेने त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. डी.डी. कोलते यांना यापूर्वी मुंबई युथ क्लबचा समाजरत्न पुरस्कार मिळाला होता. सामाजिक क्षेत्रात त्यांचे काम उल्लेखनीय राहिले आहे. शासकीय व अशासकीय विविध कमिट्यावर ते कार्यरत आहेत. पुरस्काराचे वितरण पाखरे-जी चँरीटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष गणेश पाखरे यांच्या हस्ते पार पडले

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × four =