रक्षक झाले भक्षक…

रक्षक झाले भक्षक…

कायदा सुव्यवस्था हातात घेणाऱ्या त्या गुंड प्रवृत्तीच्या बिट हवालदार राजेश कोळमकर यावर सक्तीचा रजेवर गुन्हा दाखल केला.. 

समाजकल्याण सभापती अंकुश जाधव निवती पोलिस स्टेशन उपोषण स्थळी दाखल..

कुडाळ :

दोन दिवसांपूर्वी तेंडोली आंबेडकर मधील तरूण अरुण तेंडोलकर या युवकाला गुंड प्रवृत्तीच्या बिट हवालदार राजेश कोळमकर यांनी विनाकारण दुखापत होईपर्यंत मारहाण केली. एक दलीत समाजातील सर्वसामान्य माणूस म्हणून जातीवाचक उल्लेख केला. अश्या  क्रूर समाज कंठक पोलिस खात्याला काळीमा फासणारी घटना घडल्या प्रकाराबद्दल योग्य ती कारवाई होण्यासाठी भाजप अनुसूचित जाती मोर्चा कुडाळ तालुका सरचिटणीस विष्णू तेंडोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी पासून ठिय्या आंदोलन उपोषण सुरू केले. त्या युवकाला न्याय मिळालाच पाहिजे. 

ज्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाची राज्यघटना लिहीली, कायदा बनवला त्याच देशांमध्ये अश्या अनेक प्रकारच्या गोष्टी घडत आहे. आज आमच्या समाजात महीला, युवक असुरक्षित आहेत. सुशिक्षीत समाजावर किती वेळा अन्याय, अत्याचार करणारा, दिवसा ढवळ्या भर रस्त्यात एका मागासवर्गीय युवकाला मारहाण करणाऱ्या त्या हवालदार कोळमकर वर कारवाई करा. अन्यथा आमच्याशी गाठ आहे. वेळ पडल्यास संपूर्ण समाज रस्त्यावर उतरेल. कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे. अश्या खरमरीत शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

यावेळी निवती पोलिस स्टेशन अधिकारी सांळुके यांनी योग्य ती कारवाई केली जाईल. कुठल्याही प्रकारची गय केली जाणार नाही. अन्याय होणार नाही, तपास योग्य होईपर्यंत राजेश कोळमकर यांच्यावर सक्तीच्या रजेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे  सांगण्यात आले. साळुंखे यांनी योग्य ती काळजी घेऊन समर्पक सामाजिक बांधिलकी ठेवून विषय हाताळला. यावेळी तेंडोली आंबेडकर नगरमधील बहुसंख्य महिला कार्यकर्त खंबीरपणे उभे होते.

यावेळी सभापती जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष अंकुश जाधव, चंद्रकांत वालावलकर, गुरूप्रसाद चव्हाण, महेश बिबवणेकर, मंगेश पावसकर विष्णू तेंडोलकर, सत्यवान तेडोलकर, चव्हाण, परशुराम तेंडुलकर, रमेश तेंडुलकर, एकनाथ तेडोलकर , प्रसाद तेंडुलकर आणि अनेक समाज बांधव उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा