You are currently viewing कणकवलीत शिवसेनेची नवरात्र उत्सव संदर्भात बैठक

कणकवलीत शिवसेनेची नवरात्र उत्सव संदर्भात बैठक

आम. वैभव नाईक, जिल्हा बँक मा. अध्यक्ष सतिश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक..

नवरात्रोत्सव २०२२ च्या अध्यक्ष पदी उद्योजक, ठेकेदार रामदास विखाळे तर खजिनदार पदी उपशहरप्रमुख प्रदीप मसुरकर यांची निवड..

 

कणकवली :

 

शिवसेना तालुका कणकवलीची नवरात्र उत्सव संदर्भात आज बैठक आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक मा.अध्यक्ष सतिश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. शिवसेना तालुका कणकवली आयोजित नवरात्रोत्सव २०२२ च्या अध्यक्ष पदी उद्योजक, ठेकेदार रामदास विखाळे तर खजिनदार पदी उपशहरप्रमुख प्रदीप मसुरकर यांची निवड करण्यात आली.

गेली दोन वर्षे कोरोना नवरात्र उत्सव साजरा करताना बंधने असल्याने मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करता आले नव्हते. यावर्षी मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार असून दशावतार, फुगड्या, भजन स्पर्धा, डबलबारी पैठणी स्पर्धा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

या बैठकीला उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, उपतालुकाप्रमुख राजू राणे, राजू राठोड, कन्हैया पारकर, बिरवाडी सरपंच सुदाम तेली, वागदे सरपंच रूपेश आमडोसकर, दादा भोगले, युवासेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, महेश कोदे, उपसरपंच वैदेही गुडेकर, संजना कोलते, दिव्या साळगावकर, सोमा गायकवाड, रोहित राणे, संतोष परब, प्रशांत वनसकर, चेतन पाटील, योगेश मुंज, विवेक एकवडे व शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा