संजय गांधी निराधार योजनेच्या ९७ प्रकरणांना मंजुरी…

संजय गांधी निराधार योजनेच्या ९७ प्रकरणांना मंजुरी…

मालवण

मालवण तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक मालवण तहसीलदार कार्यालयात तहसीलदार अजय पाटणे आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष मंदार केणी यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत एकूण ९७ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना ५५ प्रकरणे, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना ४, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना (गट अ) ४, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना (गट ब)३४ अशी एकुण ९७ प्रकरणे मंजूर करण्यात आली. या बैठकीस संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य गणेश कुडाळकर, सुनील पाताडे, अनुष्का गावकर, प्रमोद कांडरकर, संजय साळकर, भाऊ चव्हाण, कृष्णा चव्हाण आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा