You are currently viewing हायब्रिड वॉरफेअर’ एकही गोळी न चालवता चीनचे भारताविरोधात युद्ध

हायब्रिड वॉरफेअर’ एकही गोळी न चालवता चीनचे भारताविरोधात युद्ध

नवी दिल्ली :

लडाखमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकही गोळी न चालवता भारताविरोधात युद्ध पुकारले असल्याचे म्हटले जात आहे. या युद्धाला ‘हायब्रिड वॉरफेअर’ म्हटले जाते. चीनच्या या हेरगिरीमध्ये त्यांची झेन्‍हुआ डाटा इन्फॉरमेशन टेक्‍नॉलॉजी कंपनी लिमिटेड (Zhenhua Data)या बिग डेटा कंपनीने मदत केली आहे.
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने १९९९ मध्ये हायब्रीड वॉरफेअरसाठी ‘अमर्याद युद्धकौशल्य’च्या नावाखाली एक रणनिती आखली होती. चीनचे कर्नल कीआओ लिआंग आणि कर्नल वांग शिआंगसुई हे या प्रकल्पाचे मास्टरमाइंड असल्याचे म्हटले जाते.
चीन सरकारशी संबंधित असलेल्या झेन्‍हुआ कंपनीने भारतातील १० हजार व्यक्ती, संघटनांची हेरगिरी केली आहे. ही कंपनी बिग डेटाचा वापर करून ‘हायब्रीड वॉरफेअर’ आणि ‘चीनच्या व्यापक प्रकल्पा’साठी काम करत आहेत. चीनच्या कंपनीने राजकारण, सरकार, व्यापार-उद्योग, तंत्रज्ञान, माध्यमे आणि नागरी चळवळीतील व्यक्ती, संघटना यांना लक्ष्य करतात. चीनच्या गुप्तचर संस्था, लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांसोबत काम करते. ही चिनी कंपनी डिजिटल जगात आपल्या लक्ष्यावर बारीकपणे लक्ष ठेवते. यामध्ये दस्ताऐवज, पेटंट, नोकर भरतीची पदे आदीबाबतही माहिती ठेवली जाते.
अमेरिका, ब्रिटन, जपान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, संयुक्त अरब अमिरात (यूएई) या देशांविषयीच्या डेटाबेस कंपनीने तयार केला असल्याचेही वृत्तात म्हटले आहे.
चीनने या कंपनीच्या माध्यमातून भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे कुटुंबीय, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे कुटुंबिय, संरक्षणदल प्रमुख बिपिन रावत, सरन्यायाधीश शरद बोबडे, भारताचे महालेखा परीक्षक, जवळपास ३५० खासदारांवरही पाळत ठेवली असल्याचे वृत्त समोर आले आहे.
भाजप, काँग्रेस, डाव्या पक्षांच्या निगडीत असलेल्या नेत्यांसह प्रादेशिक पक्षांचे नेत्यांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ओडिशाचे नेते नवीन पटनाईक, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, ‘आप’चे मनीष सिसोदिया आदींचा समावेश आहे.
राजकारण्यांव्यतिरिक्त सचिन तेंडुलकरसारखे खेळाडू, गौतम अदानी सारखे उद्योगपती चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल, सोनल मानसिंग, राधे मां सारखे सेलिब्रिटी या व्यक्तीही चीनच्या हेरगिरीचे लक्ष्य असल्याचा खुलासा करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × three =