You are currently viewing उद्या कणकवली प्रहार भवनात आम. नितेश राणे यांची पत्रकार परिषद

उद्या कणकवली प्रहार भवनात आम. नितेश राणे यांची पत्रकार परिषद

कणकवली :

उद्या १४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता कणकवली प्रहार भवन येथे भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे पत्रकार परिषद घेणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या टीकेला आमदाराने काय उत्तर देणार याची सर्वांना उत्सुकता आहे. नांदगाव येथील वक्तव्याचा दाखला देऊन विरोधक त्यांच्यावर टीका करत आहेत. त्यावर राणे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करणार आहेत. या पत्रकार परिषदेला सर्व वृत्तपत्रांचे तसेच टीव्ही आणि सोशल मीडियाचे प्रतिनिधी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांच्या कार्यालयाने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा