You are currently viewing स्टॉल हटाव मोहिमेच्या पार्श्वभूमीवर उद्या केद्रीय मंत्री नारायण राणे घेणार एकत्रित बैठक

स्टॉल हटाव मोहिमेच्या पार्श्वभूमीवर उद्या केद्रीय मंत्री नारायण राणे घेणार एकत्रित बैठक

स्टॉल हटाव मोहिमेच्या पार्श्वभूमीवर उद्या केद्रीय मंत्री नारायण राणे घेणार एकत्रित बैठक

उड्डाणपुलाखाली असलेल्या स्टॉल धारकांनी घेतली केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची भेट

नगराध्यक्ष, महामार्ग प्राधिकरण,नगरपंचायत प्रशासन,आणि स्टॉलधारक राहणार बैठकीस उपस्थित

कणकवली :

स्टॉल हटाव मोहिमेच्या पार्श्वभूमीवर उद्या शनिवारी १८ रोजी नगराध्यक्ष, महामार्ग प्राधिकरण अधिकारी,नगरपंचायत प्रशासन आणि मुख्याधिकारी व कणकवलीच्या उड्डाणपुलाखाली असलेल्या स्टॉल धारकांची एकत्रित बैठक घेऊन याविषयी कोणता तोडगा काढता येईल काय याची चर्चा करू असे आश्वासन केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे स्टॉल धारकांना दिले.

कणकवली शहरातील उड्डाण पुलाखाली असलेले अनधिकृत स्टॉल हटवण्याची मोहीम महामार्ग प्राधिकरणने सुरुवात केली. त्याबाबतची तक्रार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी जाऊन स्टॉल धारकांनी केली. या संदर्भात उद्या शनिवारी एकत्रितरीत्या बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन मंत्री राणे यांनी दिले. स्टॉल धारकांनी आपल्याला पर्यायी जागा सुचवावी असेही आवाहन यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले.तुम्ही पर्याय सुचवा त्यावर आपण चर्चा करू आणि एकत्रितपणे तोडगा काढून असे त्यांनी सांगितले.ओम गणेश निवास्थानी स्टॉल धारकांच्या शिष्टमंडळासोबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सविस्तर चर्चा केली

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 8 =