You are currently viewing दोडामार्ग चेकपोस्टवर गाडीसह एकूण ४ लाख १० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त; दोघे ताब्यात

दोडामार्ग चेकपोस्टवर गाडीसह एकूण ४ लाख १० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त; दोघे ताब्यात

दोडामार्ग चेकपोस्टवर गाडीसह एकूण ४ लाख १० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त; दोघे ताब्यात

दोडामार्ग

बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी दोडामार्ग चेकपोस्ट येथे दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून टाटा आईस टेम्पो सह एकूण ४ लाख १० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नव नाझिया उरहमान साबीर सिद्दिकी ( वय २५, रा. जरारी फारुखाबाद उत्तर प्रदेश ) व सलमान हकीमुद्दिन सिद्दिकी ( वय २२, रा. उत्तर प्रदेश ) सध्या रा. फोंडा-वेतोडा, गोवा अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग तालुक्यात तीनही चेकपोस्टवर कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान काल रात्री साडेबाराच्या सुमारास बेळगावच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोची तपासणी केली असता यामध्ये मद्य साठा आढळून आला यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक डिसोजा करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − 9 =