You are currently viewing बांदा येथे बाजारपेठेत पार्किंगसाठी जागा निश्चित..

बांदा येथे बाजारपेठेत पार्किंगसाठी जागा निश्चित..

बांदा :

 

गोवा सीमेलगत असलेल्या बांदा शहरात गणेश चतुर्थी निमीत्त मोठ्या प्रमाणात बाजारपेठ भरलेली असते. त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन त्यातून बाजारपेठेत होणारी वाहतूक कोंडी, बाजारपेठेतील पार्किंग समस्या आणि इतर बाबींवर चर्चा व उपाययोजना करण्यासाठी व्यापारी, ग्रामपंचायत प्रशासन तसेच बांदा पोलिस यांची एकत्रित बैठक पोलिस सहाय्यक निरीक्षक श्यामराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.

यावेळी बाजारपेठ संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीत फटाके न वाजविण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. गणेश चतुर्थी निमित्त बांदा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. त्या अनुषंगाने बांदा पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली. यावेळी कट्टा कॉर्नर, केंद्र शाळा, कन्याशाळा ते खेमराज हायस्कूल मार्ग, बांदेश्वर मंदिर, आळवाडी मैदान, मशिदीजवळील मोकळ्या जागेत पार्किंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच बाजार भरत असलेल्या ठिकाणी मार्गावर बॅरिकेट्स टाकून चार चाकी वाहनांना जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीवर मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा