You are currently viewing १८ नोव्हेंबर रोजी तळवडे येथे पूर्वी देवीचा वार्षिक जत्रोत्सव

१८ नोव्हेंबर रोजी तळवडे येथे पूर्वी देवीचा वार्षिक जत्रोत्सव

सावंतवाडी :

 

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावातील आंबाडेवाडी येथील आई पूर्वी देवीचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार १८ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे.

लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या आई पूर्वीदेवीचा वार्षिक जत्रोत्सव मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर आरंभ होईल. पूर्वी देवीला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजवण्यात येते. या दिवशी सकाळी देवस्थानच्या मानकरांच्या उपस्थित देवीची मानाची ओटी भरल्यानंतर देवीच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होते. रात्री ११ वाजता नवसफेड व लोटांगण त्यानंतर रात्री उशिरा मामा मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळाचे नाट्य प्रयोग होणार आहेत. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा अशी आवाहन पूर्वीदेवीचे मानकरी उद्योजक राजाराम गावडे व पूर्वीदेवीच्या भक्तगणांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा