You are currently viewing मनसेचा हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध

मनसेचा हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध

मनसेचा हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध

सावंतवाडीतील शाळांना निवेदन सादर

सावंतवाडी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) राज्य सरकारच्या नवीन आदेशाला तीव्र विरोध दर्शवला आहे, ज्यामध्ये राज्यातील सर्व मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये तृतीय भाषा म्हणून हिंदी अनिवार्य करण्यात आली आहे.
या निर्णयाविरोधात मनसेने आज सावंतवाडी शहरातील विविध शाळांना भेटी दिल्या. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेले निवेदन शाळा व्यवस्थापनाला सादर करण्यात आले. मुलांवर हिंदी भाषेची सक्ती केली जाऊ नये, असा इशाराही मनसे पदाधिकाऱ्यांनी शाळांना दिला आहे.

मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी हिंदी सक्ती खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट केले. यावेळी त्यांच्यासोबत उपाध्यक्ष सुधीर राऊळ, तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, शहराध्यक्ष राजू कासकर, उपतालुकाध्यक्ष अतुल केसरकर, सुनील आसवेकर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत, उपाध्यक्ष साईल तळकटकर, आंबोली विभाग अध्यक्ष काशीराम गावडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा