You are currently viewing ओटवण्यात झालेल्या चोरीत साठ हजाराची रोकड लंपास, दागिने  सुरक्षित

ओटवण्यात झालेल्या चोरीत साठ हजाराची रोकड लंपास, दागिने  सुरक्षित

ओटवण्यात झालेल्या चोरीत साठ हजाराची रोकड लंपास, दागिने  सुरक्षित

सावंतवाडी

घरात कोणीच नसल्याची संधी साधून ओटवणे येथील प्रल्हाद शांताराम गावकर यांच्या घरात अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे. यात तब्बल साठ हजाराची रोख रक्कम लंपास केली. तर बाजूला असलेल्या डबीतील दिड लाखाचे दागिने मात्र सुरक्षित आहेत. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडल्याचा त्यांचा संशय आहे. याबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सावंतवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संशयित चोरटा माहितगार असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चव्हाटा महोत्सवा दरम्यान ऑर्केस्ट्रा कार्यक्रम असल्याने घरालगतच्या कार्यक्रमासाठी प्रल्हाद गावकर व त्यांचे कुटुंबीय हा कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. नेमकी हीच संधी साधून चोरट्याने रात्री उशिरा घराच्या दरवाजाचे कुलूप फोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर दरवाजाला आतून कडी लावुन घराच्या पाठीमागे असलेला कोयता घेऊन खोलीतील पत्र्याच्या ट्रंकचे कुलुप फोडले. त्यानंतर चोरटा या ट्रंकमधील प्लॅस्टिकच्या पिशवीतील रक्कम घेऊन घराच्या मागच्या दरवाजाने पसार झाला. याच ट्रंक मध्ये एका बाजूला डबीत सुमारे दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने होते. मात्र ही डबी चोरट्यांच्या नजरेपासून चुकली. याबाबतची तक्रार प्रल्हाद गावकर यांनी सावंतवाडी पोलिसत दिल्यानंतर अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क :*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा