You are currently viewing 12 फेब्रुवारीला मालवण पत्रकार समितीच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर..!!

12 फेब्रुवारीला मालवण पत्रकार समितीच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर..!!

मालवण :

12 फेब्रुवारीला सकाळी 10 ते 1 यावेळेत मालवण तालुक्यात पत्रकार समितीच्यावतीने तालुकावासियांसाठी येथील ग्रामीण रूग्णालयात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात हृदयविकार, मधुमेह, किडनीविकारासह हाडांच्या आजारावर मोफत तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून होणार आहे..

हृदयरोग, श्वसनविकार, मधुमेह व किडनी विकारावर रुग्णांची तपासणी डॉ. गौरव घुर्ये करणार आहे. डॉ. दत्तात्रय ठाकूर हे हाडांचे आजार, मणक्यांचे आजार, सांधेदुखी, संधीवात, हाडांचे इन्फेक्शन यासह अन्य हाडांच्या आजाराच्या रुग्णांची तपासणी करणार आहेत. या शिबिराचा तालुक्यातील रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन मालवण पत्रकार समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + 11 =