You are currently viewing सावंतवाडी शहराच्या विकासासाठीही सर्वांनी एकत्र यावे : माजी खासदार निलेश राणे…

सावंतवाडी शहराच्या विकासासाठीही सर्वांनी एकत्र यावे : माजी खासदार निलेश राणे…

सावंतवाडी येथे भव्य नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धा उदघाटन सोहळा

सावंतवाडी

जिमखाना मैदानावर तब्बल वीस वर्षांनी होत असलेल्या नगराध्यक्ष चषकाच्या निमित्ताने सर्व पक्षीय नगरसेवक एकत्र आलेत तसेच शहराच्या विकासासाठीही सर्वांनी एकत्र यावे जेणेकरून भविष्यात सावंतवाडी नगर परिषद ही राज्यातील एक नंबरची नगरपरिषद ठरेल, असा विश्वास भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केला.

सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर नगरपालिका आयोजित भव्य नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळाभाजपचे प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. श्रीफळ वाढवून तसेच नाणेफेक करून निलेश राणे यांनी स्पर्धेचा शुभारंभ केला. त्यानंतर तब्बल वीस वर्षानंतर होत असलेल्या या नगराध्यक्ष चषक स्पर्धेला निलेश राणे यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी निलेश राणे यांनी जोरदार फटकेबाजी केली. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब भाजपचे युवा नेते विशाल परब, आनंद शिरवलकर, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगांवकर, नगरपालिका सभापती सुधीर आडिवरेकर, उदय नाईक, नगरपालिका गटनेते राजू बेग, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेविका दिपाली भालेकर, समृद्धी विरनोडकर, भारती मोरे, शुभांगी सुकी, स्पर्धेचे संयोजक मकरंद तोरसकर, बांदा सरपंच अक्रम खान, नेमळे सरपंच विनोद राऊळ, दिलीप भालेकर, केतन आजगावकर, बंटी पुरोहित, ॲड. अनिल निरवडेकर आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते क्रिकेट प्रेमी तसेच उपस्थित क्रिकेट संघाचे खेळाडू उपस्थित होते.

श्री. राणे म्हणाले, जिमखाना मैदान व सावंतवाडी शहराला मोठा इतिहास आहे. यठिकाणी नगराध्यक्ष संजू परब यांनी भव्य नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. नगराध्यक्ष संजू परब हे मल्टी टॅलेंटेड असून ते काहीही करू शकतात. त्यांना जर वाटलं असतं तर ते ही स्पर्धा राज्यस्तरीयही घेऊ शकले असते मात्र स्थानिक युवकांना संधी मिळावी यासाठी त्यांनी जिल्हास्तरावर एवढ्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन केले. त्याचा सर्व खेळाडूंनी फायदा घ्यावा व सावंतवाडी जिमखाना मैदानावर होत असलेली भव्य अशी क्रिकेट स्पर्धा स्थानिक खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरावी व त्यातून राज्य व देश पातळीवर चे खेळाडू घडावेत, सावंतवाडी शहर एकविसाव्या शतकातील प्रगतशील शहर होण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत. सावंतवाडी शहरातील राज्यकर्ते अधिकारी त्यासाठी नक्कीच प्रयत्न करत आहेत हे आपणा सर्वांचे भाग्य आहे.

राजन तेली म्हणाले, सावंतवाडी शहरामध्ये सर्व नगरसेवक सामाजिक कार्यात एकत्र येतात हेच आजच्या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित शिवसेना नगरसेवकाने दिसून आले जिमखाना मैदानाला वेगळा दर्जा आहे, आंतरराष्ट्रीय खेळाडू या मैदानावर खेळून गेले आहेत, त्यामुळे मैदानावर असलेल्या समस्या लवकर मार्गी लावणे गरजेचे आहे,अशा स्पर्धेतून चांगले खेळाडू घडतील आणि त्यासाठी जी जी मदत लागेल ती राजकारण न करता वेळोवेळी केली जाईल. नगराध्यक्ष श्री परब म्हणाले, जवळपास वीस वर्षानंतर पुन्हा एकदा या मैदानावर नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धा होत आहे त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक सर्व नगरसेवकाने आपल्याला पाठिंबा दर्शवला मुख्याधिकारी यांनीही या स्पर्धेसाठी होकार दिला तसेच बक्षीस तरतूदही नगरपालिकेच्या फंडातून करण्यात आली. येत्या एक महिन्यात या मैदानावरील समस्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण काम करणारा आहे तसेच पॅव्हेलियन इमारतीचा प्रश्न संबंधित मालकी असलेल्या व्यक्तींशी चर्चा करून सोडवला जाईल.

मुख्याधिकारी श्री जावडेकर म्हणाले, कोरोना काळातही क्रीडा क्षेत्राला नैपुण्य झळाळी मिळावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे नगरपालिकेने या ठिकाणी होणाऱ्या क्रीडा संकुल अन्नासाठी दीड एकर जागा संपादन करण्यात आली आहे लवकरच या क्रीडा संकुलनामुळे क्रीडा क्षेत्राच्या वाटचालीमध्ये नक्कीच भर पडेल. सर्वांनी खिलाडी वृत्तीने तसेच कोणाचे नियम पाळून खेळ सादर करावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 5 =