महालॅबच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात आमदार वैभव नाईक यांची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

महालॅबच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात आमदार वैभव नाईक यांची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

जिल्हा शल्यचिकित्सक यांचे वेधले लक्ष

कणकवली

जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची नियमित रक्त तपासणी करण्याची गरज आहे . त्यानुसार त्यांच्यावर उपचार करणे गरजेचे असताना शासनाने नेमलेल्या महालॅब संस्थेकडून अशी रक्त तपासणीच केली जात नसल्याबाबत आमदार वैभव नाईक यांच्याकडे रुग्णांकडून तक्रारी दाखल झाल्या होत्या. याबाबत खातरजमा करत आमदार वैभव नाईक यांनी महालॅबच्या विरोधात सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. तसेच नाईक यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांचे लक्ष वेधले. कोविड रुग्णांची नियमित रक्त तपासनी न केल्या बाबत संबंधित महालॅब संस्थेवर कारवाई करण्याची मागणी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. तसेच महालॅब कडील रक्त तपासणी किट संपून देखील ती वेळेत मागवली नसल्याची बाब आमदार वैभव नाईक यांच्या निदर्शनास येताच त्यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली. याबाबत तातडीने निर्णय घेत प्रत्येक कोविड रुग्णांची रक्त तपासणी करा व त्यानुसार त्यांच्यावर उपचार करा व महालॅब संस्थेवर कारवाई करा अशा सूचना आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा