You are currently viewing सावंतवाडीत २२ मे रोजी गझलनवाज भीमराव पांचाळे यांची मैफिल

सावंतवाडीत २२ मे रोजी गझलनवाज भीमराव पांचाळे यांची मैफिल

*सावंतवाडी :*

 

ओंकार भजन मंडळ सावंतवाडी व गझल सागर प्रतिष्ठान यांच्यावतीने गझलनवाज पं. भीमराव पांचाळे यांच्या ‘एक जखम सुगंधी’ गझल मैफिलीचे आयोजन रविवार २२ मे रोजी सावंतवाडी येथील आरपीडी हायस्कुल येथे सायंकाळी ५ वा. करण्यात आले आहे. स्व. दशरथ सगम, स्व. मधुकर पास्ते या दोन गुणवंत गायकांच्या स्मृतीप्रित्यर्थ या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.

दशरथ सगम हे गझलवर निस्सिम प्रेम करणारे गायक होते. गझल संमेलनात गझलगायन सादर करून ते दाद मिळवायचे. मधुकर पास्ते भजनी बुवा होते. अनेक अनेक शिष्यही त्यांनी घडविले. दोघांच्याही कलाविषयक सेवेला उजाळा देण्यासाठी या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.

मागील बराचसा कालावधी कोरोनाच्या उद्रेकामुळे नागरिकांना जागीच थांबवून गेला. त्यामुळे गझलनवाज भीमराव पांचाळे यांची मैफिलही जिल्हयात गेली दोन वर्षे होऊ शकली नव्हती. साहजिकच जिल्हावासीयांना त्यांच्या मैफिलीचा लाभ घेण्याची संधी प्राप्त झाली आहे. मैफिलीस गझल, गायनप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन दिलीप वाडकर (९८९०८७२१२ ९) यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा