You are currently viewing धमाल

धमाल

*काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या सदस्या कवयित्री सौ.सीमा जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

*धमाल*

आटपाट नगरात एक
भरली होती सभा,
बाहेरच्यांना आत जाण्यास
नव्हती मुळीच मुभा…

वेगवेगळ्या पक्षांचे
सदस्य होते अनेक,
गर्दी खूप होती पण
खुर्ची मात्र *एक*….

प्रत्येक जण स्वतःचा
डबा जोडत होता,
गाडीसाठी अहो पण
इंजिनाचा पत्ता नव्हता…

हात दाखवून अवलक्षण
अशी स्थिती झाली,
पाहता पाहता घड्याळात
वेळही निघून गेली…

प्रचाराला सुरुवात करू
वाजवून मग तुतारी,
हातात मशाल घेऊन बघा
निघाली एक स्वारी…

रामराया तूच एकट्याने
पेलले होते धनुष्य,
एक तरी तुझ्यासारखा
निर्माण व्हावा मनुष्य…

करता करता अचानक
वादळ वारा सुटला,
नकळतपणे सगळीकडे
चिखलच चिखल झाला…

मग काय विचारता
चिखलातही झाली कमाल,
मस्त कमळ फुलले मग
अशी झाली *धमाल*…

दर पाच वर्षांनी बघा
अशीच *धमाल* होते,
हातातोंडाशी आलेला घास
खाऊन टाकतात नेते…
खाऊन टाकतात नेते…

सौ.सीमा जोशी
मोशी, पुणे

*संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा