You are currently viewing गोधडीतला सूर्य….!!
Oplus_16908288

गोधडीतला सूर्य….!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गोधडीतला सूर्य….!!*

 

सूर्य सांजावला तेव्हा

मी सावली गमावली

फिक्या सांज काळोखात

माझी माउली गमावली ..!

 

उजेडात सावलीला सोडून

परत येते …म्हणाली

अवकाश नेसून गेली

नाही …परत आली ..!

 

ती …यावी परत

सूर्य गोधडीत लपवला

सांज काळोखात सोबतीला

तिने काजवा पाठविला..!

 

गोधडीत गुंडाळून गायची

तिन्ही ..सांजेची गाणी

अंग झाकून.. पोरगा

ऐकायचा .. तिची वाणी ..!

 

सांज पेरणीचा घास

भरवायचा राहून गेला

आजही तो पोरगा

गोधडीत रडत राहिला ..!

 

गाव… त्या पोराचा

कालच पोरका झाला

गोधडीत लपवलेला सूर्य

अंधार….गिळू लागला..

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा