You are currently viewing पहाटेच जाग आली

पहाटेच जाग आली

पहाटेच जाग आली
कोणी टकटक करीत होते,🤛🏼
दार उघडून पाहिले बाहेर
तर कुणीच उभे नव्हते…🤔

आवाजाच्या दिशेने बघताच
खिडकीवर दिसला एक पक्षी,🐥
चोचीने टकटक करीत तावदानावर
उमटवीत होता नक्षी…🐧

“का रे बाबा?” विचारले तर म्हणाला,
“भाड्याने मिळेल का एखादे झाड 🌳
घरटे बांधण्यासाठी?,
एकटा कुठेही कसाही राहिलो असतो
पण जागा हवी
पिल्लांसाठी…🐣

तुमच्या भाऊबंदांनी लुटले
आमचे रान केले निर्वासित,🤯
बेघर झालोच दाण्यापाण्यासाठी
असतो आता फिरस्तित…

वर पुण्यं म्हणून ठेवतात गच्चीत
थोडे दाणे अन पाणी,🍲🫙
पण निवाऱ्याचे काय?
हे लक्षात घेतच नाही कुणी…

पोटाला हवेच, खातो ती भिक
अन नेतो थोडे घरी,🦜
खायला तर हवच,
जरी डोक्यावर छप्पर नसले तरी…🐦

कधीकधी वाटते करावी आत्महत्या🦉
बसुन विजेच्या तारेवर,
किंवा द्यावा जीव लोटून
त्या उंच मोबाईल टाॅवरवर…🦇

जसे मग आत्महत्ये नंतर
सरकार काही देते शेतक-याला,🦩
तसेच मिळेल का एखादं झाड
माझ्या पिल्लांना तरी आस-याला”🕊️

ऐकून मी चक्रावलो, खरचं
एवढा विचार मी नव्हता केला,🦃
जंगलतोडीत त्यांच्या घरांचा
विचार कुठेच नाही झाला…🦤

मी हात जोडून म्हटले,
“त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो,🦢
पण आत्महत्या करू नको
खरचं मनापासुन सांगतो…🦚

तोपर्यंत कुंडीतल्या रोपावर
बांध वनरुम किचन खोपा,🐓
अडचण होईल पण आत्ता तरी
एवढाच उपाय आहे सोपा…”🦅

तो म्हणाला, “खुप उपकार होतील,
पण भाडे कसे देणार?”,🦆
“रोज त्रिकाळ मंजुळ गाणी ऐकव,
बाकी काही नाही मागणार…”🦜

तो म्हणाला, “मला तुम्ही भेटलात
पण बाकी नातलगांच काय?,🦋
त्यांना पण घरट्यासाठी जागा हवी,
कुठे ठेवतील पाय…?”🐾

“अरे लावताहेत आता झाडे
अन जगवतात आता कुणी कुणी,🐸
बदलतेय चित्र हळू हळू, त्यांना सांग
आत्महत्या करू नका कुणी…”🙈

ऐकुन तो पक्षी उडाला
काड्या जमवायला घरट्यासाठी,🌿
अन मी पण मोबाइल उचलला
तुम्हा सगळ्यांना हे सांगण्यासाठी…🙊

त्याची खिडकीवरची टकटक
माझ्या मनाचे उघडले कवाड,⛩️
वाचुन तुम्ही पण लावाल ना
कुंडीत वा अंगणात एकतरी झाड…🌱

*निदान एक तरी झाड लावा*
*संग्रह @अजित नाडकर्णी,शुभांजित श्रुष्टी*

प्रतिक्रिया व्यक्त करा