You are currently viewing बापासाठी एक कविता

बापासाठी एक कविता

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी यशवंत पगारे यांची अप्रतिम काव्यरचना

बापासाठी एक कविता
🌹🌹🌹

बाप माझा बाप होता
शांततेचा आगार होता
मुडक्या तुडक्या रस्त्यावरती
लेकरांचा आधार होता ॥

डोंगर होता, आभाळ होता
मऊ दुधाची साय होता
आई सोडून गेल्यावरती
प्रसंगाला माय होता ॥

डोक्यावरती घेऊन भारा
चोचीमधला चारा दिला
उन्हामधे जळता लेकरे
थंड शीतल वारा दिला ॥

भरलेले जरी दिसते जग
सुने सुने झाले घर
भास होतो सदा तुमचा
भिरभिर फिरते नजर ॥

या,बसा बोला थोडे
शांत किती का बसलात तुम्ही
पाहून तस्वीर भिंतीवरची
वाटते हळूच हसलात तुम्ही ॥
<<<>>>
—यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे
बदलापूर
९८९२३३३६८३

प्रतिक्रिया व्यक्त करा