You are currently viewing मालवणात नाभिक समाजातर्फे संत सेना महाराज जयंती उत्साहात साजरी

मालवणात नाभिक समाजातर्फे संत सेना महाराज जयंती उत्साहात साजरी

मालवण

सिंधुदुर्ग नाभिक मंडळाच्यावतीने मालवणात श्री संत सेना महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, दिंडी भजन आणि नाभिक समाजाचे संत सेना महाराज यांचा जयघोष करीत काढण्यात आलेली मिरवणूक नाभिक समाज बांधवांच्या एकजुटीचे दर्शन घडवणारी ठरली. तर यनिमित्त मामा वारेरकर नाट्यगृहात पार पडलेल्या कार्यक्रमात नाभिक बांधवाना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

मालवण भरड येथून प्रदेश संघटक विजय चव्हाण यांच्या हस्ते सकाळी संत सेना महाराज यांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. बाजारपेठ ते फोवकांडा पिंपळ मार्गे ही मिरवणूक मामा वरेरकर नाट्यगृह येथे मुख्य कार्यक्रमस्थळी पोहोचली. या मिरवणुकीत आचरा नाभिक समाज बांधवांचे दिंडी भजन आकर्षण ठरले. नांदोस व कट्टा विभागातर्फे करण्यात आलेल्या देखाव्यात संत सेना महाराज, जीवा महाला, शिवा काशीद यांच्या वेशभूषेतील नाभिक समाज बांधव शिवकालीन कार्याची साक्ष देत होते. संत सेना महाराजांची पालखी बाजारपेठेतील नाभिक समाज बांधवांनी आकर्षक पद्धतीने सजविली होती. नाट्यगृहामध्ये महेश धामापूरकर यांनी संत सेना महाराजांचा जीवनप्रवास उलगडणारे कीर्तन सादर केले.

यावेळी व्यासपीठावर नाभिक समाज संघटनेचे गोवा राज्याचे सचिव व माजी अध्यक्ष लाडू सुर्लेकर, राज्य संघटक विजय चव्हाण, राज्य सरचिटणीस राजन पवार, जिल्हाध्यक्ष जगदिश चव्हाण, तालुकाध्यक्ष अॅड. भाऊ चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा प्रतिभा चव्हाण, महिला तालुकाध्यक्षा दिपा शिंदे, सचिव कांता चव्हाण, उपाध्यक्ष संदीप चव्हाण, खजिनदार जगदिश चव्हाण, कार्याध्यक्ष शुभम लाड, शहर अध्यक्ष अंकुश चव्हाण, शहर कार्याध्यक्ष नीलेश चव्हाण, सल्लागार विजय चव्हाण, आनंद आचरेकर, बाळकृष्ण लाड, उपशहर अध्यक्ष जगदिश वालावलकर, जिल्हा सचिव सुधीर चव्हाण, जिल्हा खजिनदार चंद्रशेखर चव्हाण, सहसचिव गणेश चव्हाण, माजी बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, डॉ. सुभाष दिघे, मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, महेश कांदळगावकर, दीपक पाटकर, यतीन खोत, शिल्पा खोत, अॅड. वैभव चव्हाण, विजय कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात नाभिक समाज जिल्हा संघटनेतर्फे समाजभूषण पुरस्कार विजय सीताराम चव्हाण यांना प्रदान करण्यात आला. तर मरणोत्तर समाजभूषण पुरस्कार विवेकानंद उर्फ स्वामी लाड यांना जाहीर करून त्यांचे सुपुत्र शुभम लाड यांनी हा पुरस्कार स्वीकारला. जिल्ह्याचा पहिला आदर्श नाभिक बांधव पुरस्कार शिक्षक प्रवीण कुबल यांना, तर मनोज चव्हाण कुटुंबियांनी जाहीर केलेला जिल्हास्तरीय कै. अरविंद बाली चव्हाण ज्येष्ठ समाजरत्न पुरस्कार आचरा येथील शिवराम उर्फ बबन शेट्ये यांना जाहीर करून त्याचे वितरण करण्यात आले. रोख रक्कम, मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. जिल्हा व शहर कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांसह गुणवंत मुलांचाही सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक बा. स. लाड यांनी केले. सुत्रसंचालन अॅड. पलाश चव्हाण यांनी, तर आभार कांता चव्हाण यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + 17 =